काल रात्री राजकोट येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ८२ धावांच्या फरकाने पराभव करून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने डावाच्या सुरुवातीलाच कर्णधार टेंबा बावुमा गमावला. डावाच्या चौथ्या षटकात, बावुमा दुखापतीमुळे निवृत्त झाला आणि मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकला नाही.
तिसर्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, बावुमाने वेगवान सिंगल घेण्याच्या प्रयत्नात डायव्ह केले आणि त्याच्या डाव्या कोपराला दुखापत झाली. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू खेळल्यानंतर बावुमा दुखत असल्याचे दिसून आले आणि त्यांनी फिजिओला बोलावले. फिजिओने येऊन त्याचा हात तपासला आणि मॅजिक स्प्रे लावल्यानंतर त्याच्या डाव्या कोपराला टेपने झाकण्यात आले.
त्याच्या हातात टेप झाल्यानंतर, बावुमाने बॅटने तपासण्याचा प्रयत्न केला की तो त्याचे शॉट्स खेळू शकेल की नाही. बावुमाने हेल्मेट घालून स्ट्राइक करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अचानक तो अस्वस्थ दिसू लागला आणि त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
बावुमा शेवटचा सामना गमावू शकतो
सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिका सतत विकेट गमावत असताना बावुमा कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत होता. बावुमाच्या डाव्या हाताच्या कोपरावर काळा गार्ड बांधला होता जेणेकरून त्याच्या कोपराला आधार मिळू शकेल. मैदान सोडल्यानंतरच बावुमा आता फलंदाजीला येणार नसल्याचे स्पष्ट झाले. शेवटच्या टी२० मध्ये फक्त एक दिवसाचे अंतर असल्याने, तो बेंगळुरू येथे होणाऱ्या शेवटच्या टी२० सामन्यातून बाहेर पडू शकतो असे दिसते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO । चेन्नईच्या चाहत्यांचा नाद नाय राव!, भारताच्या सामन्यांतही घुमला सीएसकेचा जयघोष
कार्तिकवर खुद्द आफ्रिकी गोलंदाजही फिदा, म्हणाला ‘तो’ सध्याचा सर्वोत्तम फिनिशर