सध्या दक्षिण आफ्रिका विरूद्ध श्रीलंका (South Africa vs Sri Lanka) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील किंग्समीड येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेल्या टेंबा बवुमाने (Temba Bavuma) असा शॉट खेळला ज्याने सर्वच आश्चर्यचकित झाले. बवुमाचा हा शॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टेंबा बवुमाच्या (Temba Bavuma) या शॉटला शाॅट ऑफ द इयर देखील म्हटले जाऊ शकते. बवुमाचा हा षटकार खरोखरच पाहण्यासारखा आहे.
WHAT A SHOT FROM TEMBA BAVUMA 🥶
– One of the best shots of this year pic.twitter.com/HRh5BlxHKi
— Johns. (@CricCrazyJohns) November 28, 2024
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 191/10 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी कर्णधार बवुमाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 9 चौकारांसह 1 षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या. यादरम्यान असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमाराने सर्वाधिक 3-3 विकेट्स घेतल्या. याशिवाय प्रभात जयसूर्या आणि विश्व फर्नांडोने 2-2 विकेट्स घेतल्या.
घरच्या मैदानाचा फायदा घेत आफ्रिकन गोलंदाजांनी श्रीलंकेला 42 धावांत आटोपले. या कालावधीत श्रीलंकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 13 धावा होती. या डावात मार्को जॅन्सनने (Marco Jansen) आफ्रिकेसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 7 विकेट्स घेतल्या. उर्वरित 2 विकेट्स जेराल्ड कोएत्झीने आणि 1 विकेट कागिसो रबाडाने (Kagiso Rabada) घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
पर्थ कसोटीत विराटच्या शतकानंतर भडकला माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार! म्हणाला…
SMAT; टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास, दिल्लीच्या नावावर अनोख्या विश्वविक्रमाची नोंद
NZ vs ENG: अद्भुत, अविश्वसनीय..! ग्लेन फिलिप्सनं पकडला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO