---Advertisement---

NZ vs ENG: अद्भुत, अविश्वसनीय..! ग्लेन फिलिप्सनं पकडला आश्चर्यकारक झेल, पाहा VIDEO

---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू फलंदाज ग्लेन फिलिप्सची क्षेत्ररक्षण इतकी जबरदस्त आहे की, विरोधी संघाच्या फलंदाजांना त्याच्या आजूबाजूच्या परिसरातही शॉट्स खेळावेसे वाटत नाहीत. ग्लेन फिलिप्स मैदानावर बिबट्याच्या गतीने आणि गरुडाच्या दृष्याने तैनात असतो. जणू त्याच्याकडे हवेत चेंडू खेळणे म्हणजे न्यूझीलंडला विकेट भेट देण्यासारखे आहे.

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी किवी संघाचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते आणि अनेक झेलही सोडले गेले. परंतु ग्लेन फिलिप्सने एक असा झेल घेतला, ज्यामुळे सोडलेल्या झेलांपेक्षा त्याच्या शानदार कॅचची चर्चा होत आहे. हा झेलही या सामन्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडची धावसंख्या चार बाद 71 वरून 4 बाद 222 पर्यंत नेली होती. सामना पूर्णपणे न्यूझीलंडच्या नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत असतानाच बॅकवर्ड पॉइंटवर ग्लेन फिलिप्सने ऑली पोपचा झेल घेत किवी संघाला सामन्यात परत आणले.

ग्लेन फिलिप्सचा हा झेल जर तुम्ही एकदा पाहिला तर तुम्हाला तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. अशाप्रकारे टिम साऊदीच्या चेंडूवर पोप फिलिप्सकरवी झेलबाद झाला. तो 77 धावांवर बाद झाला. आशाप्रकारे इंग्लंडने 222 धावांच्या स्कोअरवर पाचवी विकेट गमावली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ग्लेन फिलिप्सने फलंदाजीतही कमाल केली. त्याने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. फिलिप्सने 87 चेंडूंत सहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने या धावा केल्या. केन विल्यमसनने पुनरागमनाच्या सामन्यात 93 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा संघ 348 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 5 गड्यांच्या मोबदल्यात 319 धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूक 132 धावा करून नाबाद परतला आहे,. तर बेन स्टोक्स 37 धावांवर खेळत आहे. इंग्लंडचा संघ अजूनही 29 धावांनी मागे आहे. तर संघाच्या पाच विकेट्स शिल्लक आहेत.

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार? पाहा राजीव शुक्ला यांचे टीम इंडियाबाबत मोठे अपडेट
IND VS AUS; ‘दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार’, सुनील गावस्करांचा दावा
टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी भेट, रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---