---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला एकटा नडला टेंबा बावुमा! ठोकले कारकिर्दीतील चौथे शतक

On: गुरूवार, सप्टेंबर 7, 2023 11:51 PM
Temba Bavuma
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (7 सप्टेंबर) खेळला गेला. मालिकेतील या पहिल्याच सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघ स्वस्तात बाद झाला. पण त्यांचा कर्णधार टेंबा बावुमा याने डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली आणि वैयक्तिक शतक देखील ठोकले. चावू वर्षात बावुमाचा फॉर्म जबरदस्त राहिला असून या सामन्यात देखील हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यातील हा सामना लो स्कोरिंग राहिला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिकेला आमंत्रण दिले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीवीर टेंबा बावूमा (Temba Bavuma) याने 142 चेंडूत 114 धावांची खेळी केली. विशेष डावाची सुरुवात करायला आलेला बावुमा शेवटपर्यंत नाबाद राहिला. 49 षटकांमध्ये 222 धावा करून आफ्रिकी संघ सर्वबाद झाला. बावुमाव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.

ऑस्ट्रेलियासाठी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच मार्कस स्टॉयनिस याने 2 विकेट्स घेतल्या. संघातील शॉन ऍबॉट, ऍश्टन एगर, ऍडम झॅम्पा आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 षटकात 223 धावांचे लक्ष्य मिळाले. पण खेळपट्टी फलंदाजीसाठी प्रतिकूल असल्यामुळे ऑस्ट्रेलियाची वरची आणि मधली फली जवळपास अपयशी ठरली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर डुसेन, ऍडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एन्गडी , कागिसो रबाडा.

ऑस्ट्रेलिया – ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, ऍश्टन एगर, जोश हेझलवूड, ऍडम झाम्पा.

महत्वाच्या बातम्या – 
जुन्या फॉर्मात परतला भुवनेश्वर कुमार! यूपी टी-20 लीगमध्ये घेतल्या एकापेक्षा एक विकेट्स
धोनी-विराट नाहीत भारताचे सर्वोत्तम कर्णधार! गौतम गंभीर आपल्या ‘या’ वक्तव्याने पुन्हा चर्चेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---