भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान ‘हाय वोल्टेज’ कसोटी मालिका सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाईल. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. कोरोना महामारीनंतर भारतातील हा पहिला अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल.
चेन्नईमधील खेळपट्टी सामान्यत: फिरकीपटूंसाठी उपयुक्त मानली जाते. त्याठिकाणी चेंडूला अतिरिक्त वळण मिळत असते. अशा परिस्थितीत पहिल्या सामन्यात दोन्ही संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानावर कसोटी सामने सुरू होण्यापूर्वी आपण या मैदानावरील काही रोचक आकडेवारी पाहूया.
१) या मैदानावरील पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान १९३४ मध्ये १० फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान खेळला गेला. त्या सामन्यात इंग्लंडने २०२ धावांनी विजय मिळविला होता. त्यावेळी भारताचे कर्णधार सीके नायडू होते.
२) या मैदानावरील अखेरचा कसोटी सामना २०१६ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव आणि ७५ धावांनी विजय मिळविलेला.
३) चेपॉक नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. २०१६ मध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ७ गडी गमावून ७५९ धावा करत डाव घोषित केला होता.
४) भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत एकूण १४ कसोटी सामने जिंकले आहेत.
५) कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील बरोबरीत सुटलेला दुसरा सामना १९८६ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान याच मैदानावर खेळला गेला होता.
६) एमए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत एकूण ३२ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १० तर दुसर्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने १० सामने जिंकले आहेत.
७) चेपॉक स्टेडियमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ३३७ आहे. तसेच, दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या ३५६ इतकी आहे. या विपरीत चौथ्या डावातील सांघिक सरासरी धावसंख्या अवघी १५७ अशी आहे.
८) या मैदानावर सुनील गावस्कर यांनी सर्वाधिक १,०१८ धावा काढल्या आहेत.
९) भारताचा माजी कर्णधार व लेगस्पिनर अनिल कुंबळे याने या मैदानावर सर्वाधिक ४८ गडी बाद केले आहेत.
१०) एमए चिदंबरम स्टेडियम भारतातील असे एकमेव मैदान आहे ज्यावर दोन त्रिशतके ठोकली गेली आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग व युवा फलंदाज करून नायर यांनी तिहेरी शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जो रूटने घेतली ‘या’ भारतीय फलंदाजाची धास्ती, म्हणाला…
पुन्हा एकदा एमएस धोनी आणि ‘डेफिनेटली नॉट’ चर्चेत, ‘हे’ आहे कारण
राजस्थान रॉयल्सच्या आणखी एका क्रिकेटपटूची विकेट पडली; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली माहिती