भारतीय क्रिकेट संघात ताबडतोब फलंदाजी करणाऱ्या क्रिकेटपटूंची भरमार आहे. विस्फोटक फलंदाजांची नावे काढताच माजी क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग यांची नावे चटकन तोंडात येतात. तर सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, रिषभ पंत आठवतात. यातीलच एक नाव म्हणजे, २७ वर्षीय अष्टपैलू हार्दिक पंड्या याचे.
हार्दिक सध्या शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. दरम्यान हार्दिकचा धुव्वादार फलंदाजी करताना एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘वर्ल्ड क्रिकेटर्स’ नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हार्दिकने या व्हिडिओची लिंक आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. हा व्हिडिओ तब्बल १० वर्षे जुना अर्थातच वर्ष २०११ मधील आहे. यावेळी हार्दिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊलही ठेवले नव्हते. तसेच तो इंडियन प्रीमियर लीगचाही (आयपीएल) भाग नव्हता.
एका स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धेतील हा व्हिडिओ आहे. यामध्ये हार्दिक जबरदस्त फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याच्या लांबच लांब फटक्यांनी विरोधी संघाला चिंतेत टाकल्याचे दिसत आहे. ज्यूनियर हार्दिकची स्फोटक फलंदाजी चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि शेअर केले आहे.
From 2011 – Just a kid with a bat and dreams of making it big 😊 If I can do it, anyone can ❤️🙏🏾 pic.twitter.com/axJhOJqREf
— hardik pandya (@hardikpandya7) July 1, 2021
https://www.instagram.com/p/CQoxD2yD42l/?utm_source=ig_web_button_share_sheet
फलंदाजी असो वा गोलंदाजी, आपल्या अद्भुत प्रदर्शनाने सामन्याचा कायापालट करण्याची क्षमता असणारा हार्दिक लवकरच श्रीलंका संघाशी भिडेल. १३ जुलैपासून श्रीलंका विरुद्ध भारत वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. १८ जुलै रोजी ३ सामन्यांची वनडे मालिका संपणार आहे. त्यानंतर २१ ते २५ जुलै या कालावधीत उभय संघात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. हार्दिकला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात जागा देण्यात आली आहे.
दुखापतीमुळे मागील काही महिन्यांपासून हार्दिकला फलंदाज म्हणून भारतीय संघात निवडण्यात आले होते. परंतु श्रीलंका दौऱ्यापुर्वी आपण गोलंदाजी करण्यास सज्ज असल्याचे हार्दिकने सांगितले होते. अशात श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसह हार्दिकच्या गोलंदाजीचाही जलवा पाहायला मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता? केवळ १० चेंडूत संपला होता ‘तो’ कसोटी सामना, कारण होते विचित्रच
“युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता”, माजी पाकिस्तानी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा