मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा, विरेंद्र सेहवाग, जॉन्टी ऱ्होडस, ब्रेट ली यांसारख्या जगभरातील अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंना पून्हा क्रिकेटच्या मैदानात पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
हे दिग्गज भारतात पुढीलवर्षी होणाऱ्या रस्ता सुरक्षा जागतिक स्पर्धेत(Road Safety World Series) खेळणार आहेत. ही वार्षिक टी20 स्पर्धा पाच देशांतील निवृत्त क्रिकेटपटूंमध्ये खेळली जाणार आहे.
यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या देशांतील तेंडूलकर, लारा, सेहवाग, जॉन्टी ऱ्होडस, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान अशा खेळाडूंचा समावेश असेल.
ही स्पर्धा पुढीलवर्षी 2 ते 16 फेब्रुवारी दरम्यान भारतात होणार आहे. या स्पर्धेतून खेळाडू रस्ता सुरक्षिततेचा संदेश देतील.
तसेच इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार 110 निवृत्त खेळाडूंनी या स्पर्धेत त्यांचा सहभाग निश्चित केला आहे.
बीसीसीआयने ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठी आयोजकांना परवानगी दिली आहे.