टेनिसमध्ये २३ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्स लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. या अनुभवी खेळाडूने मंगळवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा यूएस ओपननंतर टेनिस सोडण्याचा विचार करत असल्याचे विल्यम्सने सांगितले. सेरेनाने १९९९मध्ये पहिल्यांदा यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.
A must read. https://t.co/NSWDGHzsXK
— Serena Williams (@serenawilliams) August 9, 2022
विल्यम्स बऱ्याच काळापासून तिच्या जुन्या शैलीत टेनिस खेळत नाही. याशिवाय ती सतत टेनिस स्पर्धाही खेळत नाही. सेरेना तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये म्हणाली की, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो.”
विल्यम्स म्हणाली की, “जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते आणि त्यातून दूर जाण्याची वेळ येते, तेव्हा तो काळ कठीण असतो. आता उलटी गिनती सुरू झाली आहे. मला आई म्हणून आयुष्य व्यथित करणे यावर काम करायचे आहे. वेगळ्या थ्रिलरमध्ये सेरेनाला शोधण्यावर भर आहे. मी पुढील काही आयुष्यात त्याचा आनंद लुटणार आहे.”
दरम्यान, सेरेनाने यंदाच्या विम्बल्डन ओपनमध्ये सहभाग घेतलला होता, पण पहिल्याच फेरीत ती बाहेर पडली. तिचा फ्रान्सच्या हार्मनी टॅनने पराभव केला. सेरेना सध्या कॅनेडियन ओपनमध्ये खेळत आहे. तिने दुसरी फेरी गाठली आहे. सेरेनाने सोमवारी (८ ऑगस्ट) पहिल्या फेरीत स्पेनच्या नुरिया डियाजचा ६-३, ६-४ असा पराभव केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इन्ज्यूरी, कोरोना अन् पुनरागमन! केएल राहुल तब्बल ९ महिन्यानंतर दिसणार मैदानावर
राज्य ज्यूदो स्पर्धा २०२२: विकास, संपदा, गौतमी, समीक्षा, अपूर्वा, साईप्रसाद यांनी पटकावले सुवर्ण
कार अपघातामुळे विंडीज मुकले एका चांगल्या अष्टपैलू क्रिकेटरला