लंडन | शुक्रवारी (१३ जुलै) २०१८ च्या विंम्बडन स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन अॅंडरसनने अमेरिकेच्या जॉन इसनरचा पराभव करत प्रथमच अंतिम फेरी गाठली.
या विजयाबरोबरच तब्बल ९७ वर्षांनंतर विंम्बडन पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा दक्षिण आफ्रिकन टेनिसपटू ठरला.
यापूर्वी १९२१ साली दक्षिण आफ्रिकेकडून ब्रायन नॉर्टन यांनी प्रथम विंम्बलडन पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली होती.
विंम्बलडनच्या इतिहासातील दुसरा सर्वात जास्त वेळ अर्थात ६ तास ३६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात केव्हीन अॅंडरसनने इसनरचा ७-६(६), ६-७(५), ६-७(९),६-४, २६-२४ अशा फरकाने पराभव केला.
यापूर्वी २०१० साली विंम्बडन इतिहासात जॉन इसनर वि. निकोलस माहुत हा सामना सर्वाधिक ११ तास ५ मिनिटे चालला होता. यामध्ये जॉन इसनर विजेता ठरला होता.
अत्यंत चुरशीच्या सामन्यात ८ व्या मानांकित अॅंडरसनने ९ व्या मानांकित इसनरला जोरदार लढत देत या सामन्यात बाजी मारली.
यापूर्वी केव्हीन अॅंडरसनने उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ८ वेळच्या विंम्बलडन विजेत्या रॉजर फेडररला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती.
विंम्बलडन २०१८ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात केव्हीन अॅंडरसनला दोन वेळचा विंम्बलडन विजेता राफेल नदाल किंवा विंम्बलडनची तीन विजेतेपदे मिळवणाऱ्या नोव्हाक जोकोविच विरुद्ध लढावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-तीन वर्षात प्रथमच दक्षिण आफ्रीका निचांकी धावसंख्येवर गारद
-पीव्ही सिंधु प्रथमच थायलॅंड ओपनच्या उपात्यं फेरीत