ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) सर्बियाच्या नोवाक जोकोविच विरुद्ध अमेरिकेच्या टॉमी पॉल यांच्यात पार पडला. मेलबर्न पार्क येथे पार पडलेल्या या सामन्यात जोकोविचने पॉलला 7-5, 6-1, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. तसेच, स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्याचं तिकीट पटकावलं. आता ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना जोकोविच आणि स्टिफानोस त्सित्सिपासपास यांच्यात खेळला जाणार आहे.
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये 21 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने वर्चस्व राखले. त्याला टॉमी पॉल (Tommy Paul) याने काट्याची टक्कर दिली. मात्र, जोकोविचने बाजी मारली आणि पहिला सेट 7-5 असा नावावर केला. त्यानंतर दुसरा सेटही जोकोविचच्याच पारड्यात पडला. त्याने हा सेट एकतर्फी नावावर केला. कारण, पॉलला या सेटमध्ये फक्त 1 पॉईंट मिळवता आला, तर जोकोविचने 6 पॉईंट मिळवले.
दुसऱ्या सेटप्रमाणेच सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने शानदार खेळ दाखवला. त्याने तिसऱ्या सेटमध्ये पॉलला 6-2ने हरवले. त्यामुळे जोकोविचने हा सामना 7-5, 6-1, 6-2 अशा सरळ सेटमध्ये आपल्या नावावर केला.
#AusOpen semifinals: ✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️✔️#AusOpen finals: 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆❓
Will X mark the spot for @DjokerNole on Sunday?@wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • #AO2023 pic.twitter.com/lcx6Wnm3dT
— #AusOpen (@AustralianOpen) January 27, 2023
पहिल्या उपांत्य सामन्यात स्टिफानोस त्सित्सिपास विजयी
ऑस्ट्रेलियन ओपन 2023 (Australian Open 2023) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्टिफानोस त्सित्सिपास आणि कारेन खाचनोव यांच्यात खेळला गेला. स्टिफानोस त्सित्सिपास (Stefanos Tsitsipas) याने या सामन्यात 7-6, 6-4, 6-7, 6-3 अशा सेटमध्ये जिंकला. तसेच, जागतिक तिसरा मानांकित त्सित्सिपासने स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात जागा मिळवली.
जोकोविचकडे 10वा खिताब जिंकण्याची संधी
रविवारी (29 जानेवारी) मेलबर्न येथे जोकोविच आणि त्सित्सिपास यांच्यात ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात जोकोविचकडे 10वा खिताब जिंकण्याची संधी आहे. जोकोविचने यापूर्वी 9 वेळा (2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात धडक दिली होती. त्यात त्याने विजय मिळवत हा खिताबही पटकावला होता. आता त्याच्याकडे 10व्यांदा हा खिताब पटकावण्याची संधी आहे. (Tennis player Novak Djokovic beats Tommy Paul in straight sets to reach 10th final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कारकिर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम नाही जिंकू शकली सानिया मिर्झा, पराभवानंतर अश्रू अनावर
अखेरच्या ग्रँडस्लॅममध्ये सानियाची अंतिम फेरीत धडक; ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद एका पावलावर