गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. परंतु कसोटी क्रिकेटचा प्रभाव वाढविण्यासाठी आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा २०१९ पासून सुरू करण्यात आली आणि काही नवीन नियमांसह खेळली जात आहे.
या स्पर्धेत एकूण ९ संघांनी भाग घेतला आहे. या संघांपैकी ज्या दोन संघांचे गुण सर्वात जास्त असतील त्या दोन संघांना जून २०२१मध्ये अंतिम सामन्यात स्थान मिळेल. सध्या भारतीय संघ ३६० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.
परंतु आता कोरोना विषाणूमुळे, ४ महिन्यांच्या विश्रांतीमुळे अनेक सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले आहेत. परंतु, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज विरूद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात परतले आहे.
पण असे असले तरी गेल्या काही मालिकांमध्ये काही संघांना सतत पराभवांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संघांना आता आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे अशक्य वाटत आहे. या लेखात अशा ३ संघांबद्दल जाणून घेऊ, ज्यांना चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे जवळजवळ शक्य नाही.
१. बांगलादेश क्रिकेट संघ
कसोटी क्रिकेटला पुनर्जीवित करण्यासाठी आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन केले. सध्या जर आपण चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेकडे पाहिले तर भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वल स्थानी आहे तर ऑस्ट्रेलिया २९६ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे.
भारत संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे. पण जर बांगलादेश संघाकडे नजर टाकली तर आतापर्यंत २ मालिका खेळणारा हा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे आणि अजून खातेही उघडू शकलेला नाही. सध्या गुणतालिकेतील परिस्थिती पाहता बांगलादेश संघ अंतिम फेरी गाठणे अशक्य आहे.
२. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ एक चांगला संघ आहे. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये या संघाने भाग घेतला, पण या संघासाठी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. कारण दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत २ कसोटी मालिका खेळल्या असून केवळ २४ गुण मिळवले आहेत.
इंग्लंड विरुद्ध घरच्याच मैदानावर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जर संघ घरच्याच मैदानावर जिंकू शकत नाही, तर उर्वरित मालिका जिंकणे आणि ४०० गुणांचा टप्पा पार करणे शक्य होणार नाही.
हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स या मोठ्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिका संघ संक्रमणातून जात आहे. संघातील बदलांमुळे परदेशात कसोटी मालिका जिंकणे त्यांच्यासाठी कठिण आहे.
३. श्रीलंका क्रिकेट संघ
श्रीलंका क्रिकेट संघाने आतापर्यंत कसोटी चॅम्पियनशिपच्या २ मालिका खेळल्या असून त्याच्या खात्यात ४० गुण आहेत. आता जेथे भारत ३६० आणि एकीकडे ऑस्ट्रेलिया २९६ गुणांसह गुणतालिकेत राज्य करीत आहेत, तेथे श्रीलंकेचे सध्या केवळ ४० गुण आहेत.
श्रीलंका संघाची कामगिरी सातत्याने घसरत आहे आणि श्रीलंकेचा संघ अद्याप दिग्गज संघांशी सामने खेळलेला नाही. श्रीलंकेने आतापर्यंत फक्त २ मालिका खेळल्या आहेत आणि त्यांच्याकडे ४ मालिका बाकी आहेत हे ही नाकारता येणार नाही.
पण सध्याची गुणतालिकेतील परिस्थिती पाहता अंतिम फेरी गाठणे त्यांना कठिण आहे. कारण अंतिम सामन्यात जाण्यासाठी संघाला आता उर्वरित सर्व सामने जिंकण्याचाच प्रयत्न करावा लागेल. मोठमोठ्या संघांना हा करिश्मा करणे अवघड आहे, तर त्यामुळे श्रीलंका संघ असे करणे अवघड आहे.