2027 सालामध्ये एका ऐतिहासिक कसोटी सामन्याची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे की, कसोटी क्रिकेटला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात दिवस-रात्र पिंक बॉल सामना आयोजित करण्यात येणार आहे. हा सामना 2027 मध्ये 11 ते 15 मार्च दरम्यान खेळला जाणार आहे. तसेच हे सामने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती होणार आहेत. या मैदानावरती याच्या आधी सुद्धा ऐतिहासिक क्रिकेट सामने खेळले गेले आहेत.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हा खास सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. यामागे सुद्धा रंजकदार कहाणी आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वात पहिला कसोटी सामना 1877 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावरच खेळण्यात आला होता. त्यानंतर 1977 मध्ये कसोटी क्रिकेट इतिहासाला100 वर्षे पूर्ण झाली. तेव्हाही मेलबर्न क्रिकेट मैदानावर खास सामना खेळण्यात आला होता. यावेळी फक्त फरक एवढाच असेल, ऑस्ट्रेलिया इंग्लंड मध्ये पूर्ण टेस्ट सामना दिवसा नाही, तर दिवस-रात्र कसोटी सामना असेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाच्या कसोटी सामन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वेळापत्रकाचा हिस्सा नसेल. पण हंगामातील 12 कसोटी सामन्यांमध्ये एक नक्की असेल.
इतिहासातला सर्वात पहिला कसोटी सामना 1877 मध्ये खेळण्यात आला होता. 15 ते 19 मार्चपर्यंत खेळण्यात आलेल्या या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या होत्या.चार्ल्स बैनरमैन एकट्याने ऑस्ट्रेलियासाठी 165 धावांची शानदार पारी खेळली होती. नंतर धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची पहिली पारी 196 धावांवर संपली. त्यानंतर 49 धावांनी आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने पुन्हा दुसऱ्या पारित 104 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला जिंकण्यासाठी चौथ्या पारित 155 धावा करायच्या होत्या, पण इंग्लंड 45 धावांनी पराभूत झाला.
हेही वाचा
आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचा बोलबाला, पहा कितव्या क्रमांकावर!
IPL 2025 च्या सुरुवातीस केएल राहुल बाहेर, हॅरी ब्रूकने करार संपवला!
रिषभ पंतने केला मोठा खुलासा, शॉट मारताना का सुटतो एका हातातून बॅट?