न्यूझीलंडचे क्रिकेटपटू इवन चॅटफिल्ड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. वेलिंग्टन येथे शनिवारी (26 जानेवारी) नेइनी ओल्ड बॉइज क्लबकडून खेळताना ते पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते. यावेळी त्यांनी निवृत्ती घेतली.
“68 वर्ष वय असल्याने माझाही काही स्तर आहे खेळण्याचा हे विचित्र वाटू शकते, पण आता त्या स्तरावर खेळू शकत नाही. यामुळेच मी निवृत्ती घेत आहे”, असे चॅटफिल्ड म्हणाले.
‘नेइनी एक्सप्रेस’ या टोपननावाने ओळखल्या जाणाऱ्या चॅटफिल्ड यांनी त्यांचा पहिला अनाधिकृत सामना 1968ला नेइनी पार्कवर खेळला होता. काल त्याच मैदानावर खेळताना त्यांनी निवृत्तीची घोषणा केली.
चॅटफिल्ड यांनी नेइनी ओल्ड बॉइज क्लबकडून तब्बल 51 हंगाम खेळले आहेत.
चॅटफिल्ड यांनी न्यूझीलंडकडून 1975मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता. ते सर रिचर्ड हॅडली बरोबर खेळले असून त्यांनी शेवटचा सामना 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. या दरम्यान त्यांनी 43 कसोटी सामने खेळताना 123 विकेट्स घेतल्या होत्या. तर 114 वन-डे सामन्यात 140 विकेट्स घेतल्या होत्या.
इवन चाटफिल्ड- क्रिकेटचा असा शिलेदार होणे नाही
वयाच्या ६८ व्या वर्षी क्रिकेटला टाटा- बायबाय…
एकाच संघाकडून ५१ हंगाम क्रिकेट खेळण्याचा विक्रम..
काल क्रिकेटमधून निवृत्ती…
५१वर्ष एकाच स्वप्नाचा पाठलाग केल्यावर हा माणूस आजपासून काय विचार करेल🤔… #म #मराठी #EwenChatfield pic.twitter.com/oqoY0mEZBQ— Sharad Bodage (@SharadBodage) January 27, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–कुलदिप यादव, युजवेंद्र चहलची चमकदार कामगिरी सुरूच…
–नेपाळच्या या १६ वर्षीय युवा क्रिकेटपटूने मोडला सचिन तेंडुलकरचा २९ वर्षीय जूना विक्रम
–संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड