भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील कसोटी मालिका संपली असून यजमानांनी २-० च्या फरकाने ही मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) मोठे बदल झाले आहेत. फलंदाजांच्या कसोटी क्रमवारी (ICC Batsman Test Ranking) बद्दल बोलायचे झाल्यास, सध्या खराब फॉर्मातून जात असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याला मोठे नुकसान झाले आहे. याचा फायदा भारताचा विद्यमान कसोटी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला झाला आहे.
फलंदाजांमध्ये विराटचे नुकसान, तर रोहितचा फायदा
फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत आता भारताकडून रोहितचे गुण सर्वाधिक झाले (Highest Test Rating From India) आहेत. सध्या त्याच्या खात्यात ७५४ गुण आहेत. तो सहाव्या स्थानावर कायम आहे. याउलट विराटला गुणांसह स्थानांमध्येही नुकसान झाले आहे. तो पाचव्या स्थानावरून नवव्या स्थानावर घसरला आहे. सध्या त्याच्या खात्यात ७४२ गुण आहेत.
फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वश्रेष्ट कसोटी रँकिंग आहे. बंगळुरू कसोटीतील दुसऱ्या डावात केलेल्या १०७ धावांच्या खेळीमुळे त्याला हा फायदा झाला आहे. तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एका स्थानाने प्रगती करत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्यूशेन ९३६ गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. त्याच्यानंतर जो रूट, स्टिव्ह स्मिख आणि केन विलियम्सन अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानावर आहेत.
श्रेयस अय्यरनेही घेतली मोठी उडी
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत शानदार प्रदर्शन करणाऱ्या श्रेयस अय्यरलाही मोठा फायदा झाला आहे. तो चक्क ४० स्थानांनी उडी घेत ३७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध बंगळुरू कसोटीतील पहिल्या डावात ९२ धावा आणि दुसऱ्या डावात ६७ धावांची खेळी केली होती. तसेच इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या एनक्रूमा बूनर यालाही मोठा लाभ झाला आहे. तो २२ व्या स्थानी आहे. इंग्लंडच्या जॅख क्राउलीनेही वेस्ट इंडिजविरुद्ध १२१ धावा केल्या होत्या. यामुळे त्याला १३ स्थानांचा फायदा झाला असून तो ४९ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वेगवान आणि फिरकी गोलंदाज असूनही अश्विन-बुमराहमध्ये ‘या’ महान कर्णधाराला दिसते समानता
क्षणिक सुख! रविंद्र जडेजाने गमावला ‘नंबर १’चा ताज, ‘या’ धाकड अष्टपैलूची अव्वलस्थानी उडी
इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतरही भारतीय संघ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार, पाहा कसं?