भारतीय संघाचा दिग्गज माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही तो इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत अजूनही खेळताना दिसतो. त्याने आयपीएल 2023 स्पर्धेचे विजेतेपद आपल्या संघाला जिंकून दिले होते. या स्पर्धेनंतर तो ब्रेकवरच आहे. तो त्याचा अधिक वेळ घरीच घालवतो. मात्र, तो एखादेवेळी फेरफटका मारतानाही दिसतो. धोनीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात त्याच्या आणखी एका नवीन व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एमएस धोनी (MS Dhoni) खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. तसेच, त्याच्या बाजूला एक महिला चाहतीही उभी आहे. धोनीची चाहती त्याच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. हे पाहून धोनी तिच्याशी हातमिळवणी करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, या व्हिडिओला चाहत्यांची पसंतीही मिळत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर (एक्स) व्हायरल होत आहे.
अरिजित सिंगनेही केला होता पायांना स्पर्श
मात्र, चाहत्याने धोनीच्या पायांना स्पर्श करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी दिग्गज कलाकारही त्याच्या पायाला स्पर्श करताना दिसले आहेत. आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीच्या वेळी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग यानेही धोनीच्या पायांना स्पर्श केला होता. त्यावेळचा व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला होता. यावेळी अरिजितला धोनीच्या पायांना स्पर्श करताना पाहून अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला होता.
इंस्टाग्रामवर कमी सक्रिय
एमएस धोनी इंस्टाग्राम (MS Dhoni Instgram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा खूप कमी वापर करतो. त्याला इंस्टाग्रामवर 45 मिलियनपेक्षा जास्त चाहते फॉलो करतात. धोनीने इंस्टाग्रामवर अखेरची पोस्ट त्याच्या वाढदिवशी शेअर केली होती. यामध्ये तो त्याच्या पाळीव श्वानांसोबत दिसला होता. धोनीच्या वाढदिवशी त्याने याच श्वानांसोबत केकही कापला होता. या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक लाईक्स आणि 4 लाखांहून अधिक कमेंट्स मिळाल्या होत्या.
https://twitter.com/ChakriDhoni17/status/1695662702956593478?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1695662702956593478%7Ctwgr%5Efd2ec72f16e75c2d1213c8d79b87a410d9f86bd9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fms-dhoni-female-fan-touch-his-feet-video-goes-viral-on-social-media-2482283
धोनी सोशल मीडियावर सक्रिय नसला, तरीही त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिचा सोशलवर चांगलाच वावर आहे. ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. धोनीची मुलगी झिवा धोनीही इंस्टाग्रामवर सक्रिय असते. या दोघींच्या इंस्टावरून नेहमी व्हिडिओ आणि फोटो शेअर चाहत्यांना पाहायला मिळतात. (thala ms dhoni female fan touch his feet video goes viral on social media see)
हेही वाचा-
एशियन गेम्ससाठी ‘हा’ दिग्गज बनला ऋतुराज ब्रिगेडचा गुरु, सुवर्णपदकाचे ठेवले लक्ष्य
Video: आऊट झाल्याच्या रागात फलंदाजाने फेकली बॅट; पुढं जे झालं, ते तुम्हीच पाहा