मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज अशी दहाव्या दिवसाची लढत झाली. मुंबई शहर 11 गुणांसह चौथ्या तर ठाणे 9 गुणांसह पाचव्या स्थानी होता. दोन्ही संघा पैकी विजयी संघ थेट पहिल्या स्थानी जाणार होता त्यामुळे लढत चांगली होणार यात शंका नव्हती.
दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. बचावफळी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत होती. मध्यंतराला 20-10 अशी आघाडी ठाणे संघाने घेतली होती. त्यात ठाणेच्या पकडपटूनी 10 तर मुंबई शहर च्या पकडपटूंनी 6 पकडी करत दबदबा निर्माण केला होता. ठाणेच्या अहमद इनामदार व रोहन तुपारे ने जबरदस्त पकडी करत संघाला आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरा नंतर खेळ सुरू झाल्यावर ठाणेच्या विघ्नेश चौधरीने तर मुंबई शहरच्या जतिन विंदे जे चतुरस्त्र चढाया करत आपल्या संघाला गुण मिळवून दिले. शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना 33-23 अशी आघाडी त्यानंतर मुंबई शहर कडून साई चौगुले जतिन विंदे ने चांगला प्रतिकार केल पण त्याना संघाला विजय मिळवून देता आला नाही. 37-35 असा ठाणे संघाने विजय मिळवला. ठाणेच्या विघ्नेश चौधरी ने सर्वाधिक 14 गुण मिळवले तर पकडीत ठाणेच्या तीन बचावपटूंनी प्रत्येकी 4 पकडी केल्या. (Thane Hampi Heroes beat Mumbai City Maurya Mavericks)
बेस्ट रेडर- विघ्नेश चौधरी, ठाणे हम्पी हिरोज
बेस्ट डिफेंडर्स- अहमद इनामदार, ठाणे हम्पी हिरोज
कबड्डी का कमाल- चिन्मय गुरव, ठाणे हम्पी हिरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
रत्नागिरी अरावली ॲरोज संघाने रोखला परभणी संघाचा विजयीरथ