क्रांतीज्योत मधील प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये ‘ब’ गटातील लढतीचा आज सहावा दिवस होता. सर्व सामने महत्वपूर्ण होते. नांदेड व ठाणे संघ प्ले-ऑफस साठी स्थान निश्चित करण्यासाठी तर इतर संघ प्ले-ऑफस साठी आपल्या आशा कायम ठेवण्यासाठी खेळणार होते. आजची पहिली लढत रत्नागिरी अरावली ॲरोज विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज अशी झाली. ठाणे संघाने आक्रमक खेळ करत पहिल्या दहा मिनिटात 15-03 अशी आघाडी घेतली होती.
मध्यंतराचा खेळ संपला तेव्हा ठाणे संघाने 25-15 अशी आघाडी घेतली होती. ठाणे कडून मंगेश सोनावणे चतुरस्त्र खेळ करत संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. तर रत्नागिरी कडून साईराज कुंभार एकाकी झुंज देत होता.
ठाणे हम्पी हिरोज ने संपूर्ण सामन्यात 3 लोन रत्नागिरी संघावर पाडत सामना 54-28 असा एकतर्फी जिंकला. ठाणे संघ पाचव्या विजयासह प्रमोशन व प्ले-ऑफस साठी पात्र ठरला. रत्नागिरी संघाच्या पराभवा मुळे नांदेड चांबल चॅलेंजर्स संघ सुद्धा प्रमोशन व प्ले-ऑफ साठी पात्र ठरला. ठाणे संघाकडून मंगेश सोनावणे, विघ्नेश चौधरी व चिन्मय गुरव यांनी सुपर टेन पूर्ण केले. तर अहमद इनामदार ने 6 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. तर रत्नागिरी कडून साईराज कुंभार ने सुपर टेन पूर्ण केला. (Thane Hampi Heroes team qualified for promotion and play-offs)
बेस्ट रेडर- मंगेश सोनावणे, ठाणे हम्पी हिरोज
बेस्ट डिफेंडर्स- अहमद इनामदार, ठाणे हम्पी हिरोज
कबड्डी का कमाल- साईराज कुंभार, रत्नागिरी अरावली ॲरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील सूर्यकुमारला गुरू रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, फलंदाज पुन्हा पाडणार धावांचा पाऊस?
VIDEO । रिव्हर्स स्वीप वगैरे काही नाही! मोठा शॉट खेळण्यासाठी वॉर्नरने थेट उजव्या हाताने केली फलंदाजी