---Advertisement---

या चार चुकांनी आशिया कपमध्ये अडल टीम इंडियाच घोड! वर्ल्डकपपूर्वी वाजली धोक्याची घंटा

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 3:55 PM
team-india-2
---Advertisement---

सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आशिया चषक स्पर्धा खेळली जात आहे. रविवारी (11 सप्टेंबर) होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान व श्रीलंका यांनी आपली जागा पक्की केलीये. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला मात्र सलगच्या दोन पराभवांमुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. टी20 विश्वचषक महिनाभरावर आला असताना भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जातेय. आशिया चषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी नक्की कोणत्या कारणांनी खराब झाली याचा घेतलेला हा आढावा.

मोक्याच्या क्षणी फलंदाजांचे अपयश

भारतीय संघाने साखळी फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत दोन विजय मिळवले. मात्र, सुपर फोरमध्ये भारतीय फलंदाजांना अपयश आले. केएल राहुल हा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना वगळल्यास पहिल्या चारही सामन्यात पुरता अपयशी ठरला. हार्दिक पंड्या देखील पहिल्या साखळी सामन्यानंतर फलंदाजीत झुंजताना दिसत होता. सूर्यकुमार यादव, रिषभ पंत व दीपक हुडा हे देखील महत्त्वाच्या सामन्यांमध्ये जबाबदारीने खेळ दाखवू शकले नाहीत.

वेगवान गोलंदाजीत कमी पर्याय

आशिया चषकासाठी भारतीय संघाची संघ निवड झालेली तेव्हा फक्त तीन वेगवान गोलंदाजांना संघात स्थान त्यातील अर्शदीप सिंग वगळता आवेश खान व भुवनेश्वर कुमार यांनी अपेक्षित कामगिरी करून दाखवली नाही. तसेच मोहम्मद शमी तंदुरुस्त असतानाही त्याला संघात समाविष्ट केले गेले नसल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

रवींद्र जडेजाची दुखापत

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या रवींद्र जडेजा साखळी फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर झाला होता. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजी व गोलंदाजीत उपयुक्त योगदान दिलेले. त्याची उणीव भरून काढण्यात दीपक हुडा याला यश आले नाही.

फिरकी गोलंदाजीत तिसरा पर्याय कोण?

आशिया चषकात अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहल हा सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नाही, याचा फटका भारतीय संघाला बसला. दुसरीकडे केवळ रवी बिश्नोई याच्या रूपाने एकच उत्कृष्ट फिरकी गोलंदाज भारतीय संघासाठी भविष्यात काम करताना दिसू शकतो. रविचंद्रन अश्विन विश्वचषक संघाचा भाग असेल की नाही याबाबत अद्यापही प्रश्न आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडला भारताचा संघ, टीमबाहेर असलेल्या ‘या’ गोलंदाजाला संधी
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट
महास्पोर्ट्सचा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---