---Advertisement---

मैदानातील वैर विसरुन विजेता संघनायक केनने विराटला मारली मिठी, भारतीय चाहत्यांकडून भरभरुन कौतुक

On: गुरूवार, जून 24, 2021 11:25 AM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपदचा स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी (२३ जून) रोजी संपला. भारताचा प्रतिस्पर्धी असलेला न्यूझीलंड संघ या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिलावहिला विजेता बनला. त्यांनी भारतीय संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचा महत्वाचा वाटा राहिला. या ऐतिहासिक विजयानंतर विलियम्सनने आपल्या कृतीने कोट्यावधी भारतीय क्रिकेटरसिकांची मने जिंकली.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य दिले होते, जे न्यूझीलंड संघाने २ विकेट गमावून सहपणे पार केले. कर्णधार केन विलियम्सनने ५२ आणि रॉस टेलर ४७ धावांवर नाबाद राहिले आणि त्यांनी आपल्या संघाला जेतेपद जिंकून दिले. जरी न्यूझीलंड संघ विजयी झाला, तरीही कर्णधार विलियम्सनने विजयाचा अभिमान न बाळगता विरोधी संघनायक कोहलीची भेट घेतली.

न्यूझीलंडला विजय मिळताच कोहलीने न्यूझीलंड संघाचा कर्णधार विलियम्सनचे विजयाबद्दल अभिनंदन केले. या विजयाबद्दल त्याचे अभिनंदन करताना भारतीय कर्णधार कोहलीने विलियम्सनला मिठी मारली. विलियम्सननेही त्याच्या मिठीचा स्विकार केला. मैदानावरी वैरी असणाऱ्या या कर्णधारांच्या भरत मिलापच्या छायाचित्राने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहते विलियम्सनचे तोंडभरुन कौतुक करीत आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराटने न्यूझीलंड संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धा विजयाचा दावेदार संबोधले आहे. तो म्हणाला, “जर आमच्या संघाने राखीव दिवशी अजून ३०-४० धावा केल्या असत्या. तर विजय आमचा असू शकला असता. परंतु न्यूझीलंडच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यांच्या गोलंदाजांनी आम्हाला धावा काढू दिल्या नाहीत. ते या ऐतिसाहिक सामना विजयाचे दावेदार होते.”

त्याचबरोबर ऐतिहासिक विजयानंतर विलियम्सन म्हणाला, “मी विराट आणि भारतीय संघाचे आभार मानतो. ते एक अविश्वसनीय संघ आहेत. हे आम्हाला माहित होते की, भारताविरुद्धचा अंतिम सामना किती आव्हानात्मक असेल. तरीही आमचा संघ विजय नोंदविण्यात यशस्वी झाला याचा मला आनंद आहे.”

महत्वाच्या बातम्या

ऐतिहासिक लढतीचे नायक! आयसीसीच्या पहिल्यावहिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘हे’ ठरलेत सामनावीर

न्यूझीलंडविरुद्धचा पराभव कॅप्टन कोहलीसाठी दुर्दैवी, अंतिम सामन्यात पोहोचून ‘इतक्यांदा’ गमावलाय चषक

टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---