कोलकाता… भारतातील चार अतिमहत्त्वाच्या शहरांपैकी एक. राजकीय, सांस्कृतिक आणि खेळ या साऱ्याच क्षेत्रातील महत्वाच्या घटनांत कोलकाता केंद्रस्थानी असते. फक्त खेळाचा विचार केला, तर कोलकात्यातील सर्वात मोठा ब्रँड म्हणजे सौरव गांगुली. क्रिकेटजगतात ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ नावाने आपली ओळख निर्माण करणारा गांगुली रिटायरमेंटनंतर, बीसीसीआय प्रेसिडेंट बनवून आपला दबदबा राखून आहे, पण एक वेळ अशी आली होती की, याच दादाला याच कोलकात्यातून अपमानित करून पाठवलं होतं. आज त्याचीच कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.
सन २००८ला इंटरटेनमेंटच नवं रूप घेऊन इंडियन प्रीमियर लीग अवतरली. भारतात सिटी बेस्ड फ्रॅंचाईजी लीगचा हा पहिलाच प्रयत्न. त्यात सर्वांची नजर होती कोलकाता फ्रॅंचाईजीवर. कोलकाता नाईट रायडर्स या नावानं उतरलेला हा संघ ब्रँडिंगच्या बाबतीत बाकी टीमच्या दहा पावले पुढे निघाला. एकतर संघाचा मालक होता सुपरस्टार शाहरुख खान. कॅप्टन बनवलेल तोपर्यंतचा सर्वात सक्सेसफुल इंडियन कॅप्टन सौरव गांगुलीला. इंटरनॅशनल सुपरस्टार आणि सगळ्यात भारी होतं त्यांचं अंथम कोरबो लोरबो जीतबो.
आयपीएल सुरू झाली अन् पहिली मॅच सोडल्यानंतर कोलकाताची गाडी चढ-उतारावरून पळायला लागली. शेवटी सीजन थांबला, तेव्हा ते राहिले सहाव्या नंबरला. गांगुली, मॅकलम, पॉंटिंग, गेल, अख्तर ही त्यावेळची सारीच टॉप मंडळी संघात असताना संघ अपयशी ठरलेला. सिझन संपला.
कोलकाताच्या गोटातून बातमी आली कॅप्टन गांगुली आणि कोच जॉन बुकानन यांच वाजलंय. बुकानन म्हणजे ऑस्ट्रेलियाला तीन वर्ल्डकप जिंकून देणारा कोच. टी२० तसा नवा प्रकार. बुकानन यांना टीममध्ये चार कॅप्टन पाहिजे होते. गांगुली, मॅकलम, एक बॉलिंग डिपार्टमेंटचा कॅप्टन आणि आणखी एक कोणीतरी. असं बुकानन यांचं प्लॅनिंग होतं. गांगुलीला हे काही पटत नव्हतं परिणामी टीम गडबडली.
दुसरा सीजन झाला दक्षिण आफ्रिकेत. त्या सीजनआधी बुकानन यांनी आपलं म्हणणं खरं करूनच दाखवलं. गांगुलीला कॅप्टन्सी सोडायला लावली अन् ब्रेंडन मॅकलम केकेआरचा कॅप्टन बनला. बुकानन यांचा हा प्रयोग मात्र पुरता फसला. पहिल्या सिझनला सहाव्या नंबरला राहिलेली केकेआर, यावेळी तर डायरेक्ट लास्टच आली. केकेआर मॅनेजमेंटला चूक कळाली आणि त्यांनी मनमर्जी करणाऱ्या बुकानन यांना नारळ दिला. तिसऱ्या सिझनला गांगुली पुन्हा केकेआरचा मेन नाईट बनला. टीमने लास्ट मॅचपर्यंत संघर्ष केला पण ते काय प्ले ऑफपर्यंत जाऊ शकले नाहीत.
हेही पाहा- गांगुलीला केकेआरमधून बाहेर काढल्यावर कोलकातामध्ये निघाले होते मोर्चे
तीन सिझन संपले आणि यात सगळ्यात खराब कामगिरी करणारी टीम होती केकेआर. आता शाहरुखच्या इज्जतीचा सवाल होता. त्याने टीम तर टीम, सगळी मॅनेजमेंटच बदलली. टीमचे सीईओ बनले शार्प माइंडेड वेंकी मैसूर. मैसूर यांच्यापुढे मेन टारगेट होते, केकेआरला चॅम्पियन बनवण आणि ब्रँड व्हॅल्यू वाढवणे. शाहरुखने त्यांना फ्रीहँड दिला. मैसूर यांनी पहिल्यांदाच मोठा निर्णय घेतला आणि सरळ गांगुलीलाच बाहेर केलं. कोलकात्यात खळबळ उडाली. जिथे दादा नाही तिथे तुम्हाला फॅन ही नाही, असंच लोकांनी ठरवलं, पण मैसूर अडून राहिले.
तिकडं असाच बोलताना गांगुली कुठेतरी म्हंटला, “शाहरुख मला म्हणालेला तुला हवी तशी तू टीम चालव, पण असं काही घडलं नाही.” वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. शाहरुख आणि गांगुलीत वाद असं चित्र निर्माण झालं. कोलकात्यात तर केकेआरविरूद्ध मोर्चेही निघाले.
केकेआरने रिलीज केल्याने दादा आता लिलावात आला, पण इथे त्याला त्यापेक्षा मोठा धक्का बसला. त्याच्यावर कोणी बोलीच लावली नाही. तो अनसोल्ड गेला. इकडं केकेआरला नवा कॅप्टन भेटलेला गौतम गंभीर. काहीही करून आपल्याला आयपीएल खेळायचीय असा चंगच दादाने बांधला. त्या वर्षी पहिल्यांदाच आलेल्या पुणे वॉरियर्स इंडियाचे मालक होते सहाराश्री सुब्रतो राय. त्यांचं अन गांगुलीच जिव्हाळ्याचा संबंध. याच दोस्तीचा फायदा दादानं उचलला आणि तो निम्म्या सिझननंतर पुणेकर झाला.
जवळपास वर्षभरानंतर २०१२ ला ५ मे या दिवशी दादा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळायला उतरला. तेही कोलकात्याच्या टीम विरोधात पुण्याचा कॅप्टन म्हणून, तेव्हा सारे जण जणू काय दादाच्या अपमानाचा बदला घ्यायलाच सज्ज होते. मॅच केकेआरच्या होम ग्राऊंडवर होती आणि सपोर्ट होता पुण्याला. त्यादिवशी स्टेडियममधील ८० % फॅन्स फक्त एका माणसाला सपोर्ट करायला आलेले तो होता सौरव गांगुली. शेवटी फॅन्सचा हिरमोड झाला आणि केकेआर जिंकली. फक्त दादान ३६ रन्स केल्या इतकंच काय ते समाधान.
दादाला घेतला नाही म्हणून नाराज झालेल्या फॅन्सला आपलं करून घेण्यात केकेआर त्याचवर्षी यशस्वी ठरली. त्यांनी आयपीएल जिंकली आणि सारे काही आलबेल झाले. त्यांचा शाहरुखवरचा राग गेला, सोबतच गंभीरला त्यांनी आपलस केल. दुसरीकडे, एकवेळ आयपीएल लिलावात अनसोल्ड गेलेला दादा आज तीच आयपीएल चालवतोय. हाच काय तो नियतीचा खेळ.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शंभर नाही, तर दीडशेहून अधिक मॅच खेळले, पण कर्णधार पदापासून नेहमीच वंचित राहिले ‘हे’ भारतीय खेळाडू
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती
आयपीएलने भारताला दिलेला पहिला टी२० स्टार होता युसुफ, इरफानचा भाऊ ओळख पुसत त्याने स्वत:ची बनवलेली ओळख