इंडियन प्रीमियर लीग प्रमाणेच पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तान सुपर लीगचा आगामी हंगाम 17 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र, याआधी लीगला मोठे धक्के बसत आहेत. वास्तविक, जगभरातील अनेक परदेशी खेळाडू PSL 2024 मधून आपली नावे मागे घेत आहेत. तसेच पाकिस्तान सुपर लीगला गद्दाफी स्टेडियमवर गतविजेत्या लाहोर कलंदर विरुद्ध दोन वेळा चॅम्पियन इस्लामाबाद युनायटेड यांच्यात होणार आहे.
याबोरबरच PSL 2024 चे सर्व सामने लाहोर, मुलतान, कराची आणि रावळपिंडी येथे आयोजित केले जाणार आहेत. तसेच पहिला सामना लाहोरमध्ये होणार आहे, तर विजेतेपदाचा अंतिम सामना हा 18 मार्चला कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. अशातच सर्व सहा फ्रँचायझी संघांचे मोठे नुकसान झाले असून अनेक खेळाडूंनी ‘बांगलादेश प्रीमियर लीग’, ‘ILT20’ आणि ‘SA20’ लीगची निवड केली आहे.
तसेच पीएसएल संघ मुलतान सुलतान्सला अनेक प्रमुख खेळाडूंचा पाठिंबा मिळणार नाही. यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपली हा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर होणारा एक खेळाडू आहे. तर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की त्यांनी पीएसएलमध्ये खेळण्यासाठी टोपलीला एनओसी प्रमाणपत्र जारी केले नाही.
तर या हंगामासाठी क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या कर्णधारपदात बदल करण्यात आला आहे. सर्फराज खानच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रॉसोची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा आणि वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसैन हे 9व्या हंगामासाठी क्वेटा ग्लॅडिएटर्समध्ये सामील झाले आहेत.
दरम्यान, पीएसएल 2024 चे सामने भारतात थेट प्रक्षेपित होणार नाहीत. परंतु सामन्यांचे थेट प्रवाह फॅनकोड ॲप आणि वेबसाइटद्वारे केले जाईल, जिथे तुम्ही संपूर्ण हंगाम थेट पाहू शकता. याबरोबरच, PSL 2024 मध्ये खेळले जाणारे सामने रात्री 8 वाजता सुरू होतील. याशिवाय डबल हेडरचा पहिला सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG :कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हातात काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले भारतीय खेळाडू, जाणून व्हाल थक्क
- IND vs ENG : सरफराज खानच्या वडिलांना आनंद महिंद्रांनी दिली मोठी ऑफर, म्हणाले “प्रेरणादायी…