सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. तर या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 2 गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. याबरोबरच, या सामन्यात टीम इंडियाला विकेट्सची गरज असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताच भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू हातात काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले आहेत. कारण माजी भारतीय क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड निधन झाले आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. तसेच दत्ताजीराव गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते आणि टीम इंडियाचा सर्वात वयस्कर क्रिकेटर होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर होता. तसेच माजी कर्णधाराचे गेल्या मंगळवारी निधन झाले आहे.
याबरोबरच, बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे माहिती देताना म्हंटले आहे की, “भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारताचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ काळ्या हाताची पट्टी हाताला बांधेल.” तसेच दत्ताजीराव गायकवाड यांनी भारतीय संघासाठी 11 कसोटी सामने खेळले होते. याबरोबरच माजी कर्णधाराने 1952 ते 1961 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.
#TeamIndia will be wearing black arm bands in memory of Dattajirao Gaekwad, former India captain and India’s oldest Test cricketer who passed away recently.#INDvENG | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 17, 2024
दरम्यान, दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. दत्ताजीराव गायकवाड यांनी मुंबई विद्यापीठ आणि बडोद्यात महाराजा सयाजी विद्यापीठाकडून क्रिकेट करिअरला सुरुवात केली होती. तसेच दत्ताजीराव गायकवाड यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्यांनी 18.42 च्या सरासरीने 350 धावा केल्या. 1952 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात त्यांनी कसोटीमध्ये पदार्पण केले होते. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्यांनी भारतीय संघाची धुरा पाहिली होती. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाला 5-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : सरफराज खानच्या वडिलांना आनंद महिंद्रांनी दिली मोठी ऑफर, म्हणाले “प्रेरणादायी…
- IND vs ENG 3rd Test : भारताला मोठा झटका! तिसऱ्या कसोटी सामन्यातून अश्विनची अचानक माघार, बीसीसीआयने दिली माहिती…