---Advertisement---

IND vs ENG 3rd Test : भारताला मोठा झटका! तिसऱ्या कसोटी सामन्यातून अश्विनची अचानक माघार, बीसीसीआयने दिली माहिती…

R-Ashwin
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला धक्क्यांमागून धक्के मिळताना पाहायला मिळत आहे. सुरुवातील वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन सामन्यांतून माघार घेणाऱ्या विराट कोहलीने संपूर्ण मालिकेकडेच पाठ फिरवल्याची दिसली. तसेच त्यात दुखापतीचे ग्रहण सुरूच आहेच. याबरोबरच लोकेश राहुलला दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीला मुकावे लागले. त्यामुळे युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली होती. 

त्यातच तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने ५०० बळींचा टप्पा पूर्ण करत इतिहास रचला. पण त्याचदिवशी आश्विनने या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती देखील दिली आहे. याबरोबरच भारतीय संघाला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला विकेट मिळत नव्हती. त्यावेळी रोहित शर्माने अश्विनला गोलंदाजीला आणले. अश्विनने यावेळी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आणि त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले होते.

अश्विनने इंग्लंडचा कर्णधार झॅक क्राऊलीला १५ धावांवर बाद केले. यापूर्वी अश्विनच्या कसोटी क्रिकेटमध्ये ४९९ विकेट्स झाल्या होत्या. पण यावेळी ही विकेट त्याने घेतली आणि त्याने ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा पूर्ण करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला. त्यानंतर अश्विनने आपली ५०० वी विकेट आपल्या वडिलांना समर्पित केली होती. पण त्यानंतर शुक्रवारी रात्री अश्विनने अचानक तिसऱ्या कसोटीमधून माघार घेतल्याचे आता समोर आले आहे. हा कसोटी सामना सोडून अश्विन हा आपल्या घरी गेला आहे.

याबरोबरच, बीसीसीआयने अश्विनबाबत म्हटले आहे की, ” कौटुंबिक कारणांमुळे आर. अश्विनने भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली. या कठीण काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि भारतीय संघ अश्विनच्या पाठिशी आहोत.”

दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवस हा भारतासाठी महत्वाचा आहे आणि खास करून भारतीय गोलंदाजीसाठी हा दिवस मोठा होता. कारण भारताला इंग्लंडला ऑल आऊट करायचे आहे. त्यामुळे भारताची गोलंदाजी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---