भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिकेला बुधवारी (18 जानेवारी) सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झाला. याच सामन्यात शुभमन गिल याने वादळी द्विशतक झळकावले. ही त्याची वनडे सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. मात्र, भारताकडून वनडे सामन्यांत सर्वोच्च धावसंख्या कोणत्या खेळाडूची आहे ते आपण या लेखात पाहूयात…
टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळी करत द्विशतक झळकावले. शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावा केल्या. यासाठी त्याने 19 चाैकार तर 9 षटकार झळकावले. भारताकडून द्विशतक झळकावणारा शुभमन हा पाचवा खेळाडू ठरला आहे. म्हणजेच भारताकडून अगोदर चार खेळाडूंनी द्विशतक साकारले आहे. भारताकडून यापूर्वी वनडे द्विशतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (), विरेंद्र सेहवाग (), ईशान किशन () यांची नावे आहेत. आता या यादीत शुबमन गिल नव्याने सामील झाला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय फलंदाज-
या यादीत भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार राेहित शर्मा हा पहिल्या क्रमांकावर असून त्याने वनडे सामन्यात त्याने 264 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 219 ही आहे. तिसऱ्या क्रमांकावर इशान किशन आहे, ज्याने मागच्या महिन्यात त्याने वनडे सामन्यात 210 धावा केल्या आहेत. पुन्हा चौथ्या क्रमांकावर राेहित शर्मा असून त्याने 209 धावा आणखीन एक वनडे सामन्यात केल्या आहेत. त्यानंतर आता पाचव्या क्रमांकावर शुभमन गिल आला असून त्याने 208 धावा करत या यादीत स्थान मिळवले आहे. पुन्हा सहाव्या क्रमांकावर पुन्हा राेहित शर्माचे नाव आहे. यावेळी रोहित शर्माने 208 धावा केली होती. अखेरीस सातव्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 200 धावा केल्या आहेत. (The batsman who made the greatest ODI innings for India)
पाहा यादी –
264 – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका (कोलकाता, 2014)
219 – विरेंद्र सेहवाग विरुद्ध वेस्ट इंडीज (इंदोर, 2011)
210 – ईशान किशन विरुद्ध बांगलादेश (चट्टोग्राम, 2022)
209 – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बेंगलोर, 2013)
208 – शुबमन गिल विरुद्ध न्यूझीलंड (हैदराबाद, 2023)
208 – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका (मोहाली, 2017)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही चांगली भागीदारी केली पण…’, संघाच्या पराभवातही मैफिल लुटणाऱ्या मायकल ब्रेसवेलची खास प्रतिक्रिया
घरच्या मैदानावर ‘मियॉं मॅजिक’! सिराजच्या धारदार गोलंदाजीने पालटला सामन्याचा नूर