2025च्या आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावापूर्वी संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतील, असा प्रश्न आहे. बीसीसीआयने (BCCI) मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) आयपीएल 2025 मधील राखीव नियमांबाबत निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय आयपीएल फ्रँचायझीला 5 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय संघांना पाच खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते. मात्र, ‘नो राइट टू मॅच’चा पर्याय उपलब्ध होणार नाही. बीसीसीआयने वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 संघांसोबत कायम ठेवण्याच्या बाबत चर्चा केली. बहुतेक संघांना 5-6 खेळाडू कायम ठेवायचे होते. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) पाच खेळाडूंना कायम ठेवण्याचा विचार करत आहे.
NO RTM CARD FOR IPL 2025.
– The BCCI set to allow 5 retentions without any RTM card for IPL 2025 Auction. (Express Sports). pic.twitter.com/eG0AcbqzQh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 25, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“तू मूर्ख नाही, मी मूर्ख आहे” स्टार खेळाडूने सांगितला धोनीचा किस्सा
IPL 2025: ‘हा’ स्टार खेळाडू सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?
कानपूरच्या स्टेडियममध्ये प्रथम गोलंदाजी करण्यास घाबरतात संघ? आकडेवारी धक्कादायक!