भारतीय संघाने (u19 team india) १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (u19 wc 2022) मध्ये विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात इंग्लंडवर ४ विकेट्स राखून संघाने मात केली आणि इतिहासात पाचव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाकडे वेस्ट इंडीजमध्ये या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जास्त वेळ नाहीये. संघ रविवारी (६ फेब्रुवारी) भारतासाठी रवाना होणार आहे. बीसीसीआयने (bcci) जाहीर केले आहे की, विश्वचषक विजेत्या संघाचा अहमदाबादमध्ये गौरव करण्यात येणार आहे.
भारताचा मुख्य संघ सध्या मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बायो बबलचे पालन कडक केले जात आहे, अशात १९ वर्षाखालील खेळाडूंसोबत मुख्य संघातील खेळाडूंची चर्चा होईल की नाही, याविषयी कसलीही स्पष्टता आलेली नाहीय. बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “खेळाडूंचा कार्यक्रम खूप व्यस्त राहिला आहे आणि त्यांना आराम करण्याची खूप कमी संधी मिळाली आहे. भारतात पोहोचल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी काही वेळ मिळेल.”
रविवारी बीसीसीआयने विश्वचषक विजेत्या भारताच्या १९ वर्षाखालील संघातील प्रत्येक खेळाडूल ४० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. अंतिम सामना अँटिग्वामध्ये खेळला गेला आणि त्यानंतर संघ गयानासाठी रवाना झाला. गयानामध्ये भारताचे उच्चायुक्त केजे श्रीनिवास यांनी संघाला सन्मानित केले. श्रीनिवास यांनाही क्रिकेटची आवड आहे. भारतीय खेळाडू थकलेले असतानाही कार्यक्रमात उपस्थित असलेले वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज सर कर्टली एम्ब्रोस यांच्यासह त्यांनी फोटो घेतले.
व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मिळाले मार्गदर्शन
दरम्यान, विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व दिल्लीचा युवा फलंदाज यश धूलने केले. त्याच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर कार्यरत आहेत. त्याव्यतिरिक्त विश्वचषक स्पर्धेत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मार्दर्शनही खेळाडूंना मिळाले. लक्ष्मण संपूर्ण वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघासोबत होते. संघातील पाच खेळाडूंना जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा, लक्ष्मण यांचे विशेष सहकार्य संघाला लाभले.
महत्वाच्या बातम्या –
गांगुली, अश्विन ते रहाणे, भारताच्या विश्वविजेत्या ‘यंगिस्तान’चं होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स
दुःखद बातमी: सुरेश रैनाला पितृशोक; कॅन्सरविरुद्धची झुंज अखेर संपली