विराट कोहलीच्या 71व्या शतकाचा जल्लोष जगभर साजरा झाल्यासारखा वाटतोय. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनीही विराटला त्याच्या 71व्या शतकाबद्दल ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने किंग कोहलीची स्तुती करताना काहीतरी लिहिलं, ज्यामुळे पाकिस्तानी चाहते नाराज झाले आहेत.
इमादने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2021च्या टी20 विश्वचषकादरम्यान खेळला आणि तेव्हापासून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. इमादने ट्विटरवर विराट कोहलीला टॅग केले आणि लिहिले की, “ग्रहावरील सर्वोत्तम क्रिकेटर परत आला आहे.”
मग काय, या ट्विटवर पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या क्रिकेटपटूला बाबर आझमचा हेवा वाटतो, म्हणून त्याने विराटसाठी असे ट्विट केले आहे, असेही एका चाहत्याने लिहिले आहे.
आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने होतील, तर भारत आणि अफगाणिस्तान स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही संघांनी गुरुवारी आपला शेवटचा आशिया कप सामना खेळला, ज्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव झाला. विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. विराट कोहलीचे हे 71वे आंतरराष्ट्रीय शतक होते. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात विराटने ‘या’ क्रमांकावर फलंदाजी करावी, ‘द ग्रेट वॉल’ने दिला सल्ला
जडेजाच्या विरोधात रचला गेला कट? ‘त्यामुळे’ नाही खेळणार टी-20 विश्वचषक
दुलिप ट्रॉफी 2022: यशस्वी जयसवालचे फर्स्ट ‘क्लास’ द्विशतक, कॅप्टन रहाणेही दिसला फॉर्ममध्ये