भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पाच वर्षांनंतर शुक्रवारी (12 जानेवारी) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. उत्तर प्रदेशसाठी खेळताना वेगवान गोलंदाजाने बंगाल संघाचा घाम काढला. ग्रुप ‘B’ मधील या सामन्यात पहिल्या दिवसाखेर बंगाल संघ 35 धावांनी आघाडीवर आहे. पण उत्तर प्रदेशसाठी पाच विकेट्स घेत भुवनेश्वर कुमार याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली.
कामपूरच्या ग्रीन पार्क मैदानात उत्तर प्रदेश विरुद्ध बंगाल हा रणजी सामना खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात बंगालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगाल संघाचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघ 20.5 षटकांमध्ये अवघ्या 60 धावा करून सर्वबाद झाला. संघातील एकही फलंदाज 13 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. समर्थ सिंग याने 41 चेंडूत 13 धावांची सर्वोत्तम खेळी पहिल्या डावात उत्तर प्रदेशसाठी केली. संघातील दोन फलंदाज शुन्यावर बाद झाले, तर सहा फलंदाजांनी एक आकडी धावसंख्येवर विकेट्स गमावल्या. ईशान पोरेल (2), सुरज जयस्वाल (3) आणि मोहम्मद कैफ (4) यांनी 10 विकेट्स वाटून घेतल्या.
प्रत्युत्तरात बंगाल संघ पहिल्या दिवसाखेर 5 विकेट्सच्या नुकसानावर 95 धावांपर्यंत मजल मारू शकला. विशेष म्हणजे या पाचही विकेट्स उत्तर प्रदेशसाठी एकट्या भुवनेश्वर कुमार याने घेतल्या. भुवनेश्वरने ग्रीन पार्कवर रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी 13 षटके गोलंदाजी केली आणि 25 दावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. यातील 3 षटके त्याने निर्धाव टाकली अशून इकॉनॉमी रेट अवघा 1.92 इतका होता. भुवनेश्वरचे हे पुनरागमन नक्कीच जबरदस्त म्हणथा येईल. तब्बल पाच वर्षांनंतर ‘रेड बॉल’ क्रिकेट खेळणाऱ्या भुवनेश्वरचे हे प्रदर्शन भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधनारे ठरले.
The Bhuvneshwar Kumar fifer in the Ranji Trophy. 🔥
– First First-Class match in 6 years and Bhuvi delivers…!!! 🫡pic.twitter.com/mfelJmz5YE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 12, 2024
दरम्यान, भुवनेश्वरने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये खेळला आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये वेगवान गोलंदाजाला भारतासाठी एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने कही सामना खेळला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याने शेवटचा सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला आहे. (The Bhuvneshwar Kumar fifer in the Ranji Trophy.)
महत्वाच्या बातम्या –
कुलदीप-चहल नकोच; ‘या’ क्रिकेटरला विश्वचषकात द्या संधी, गावसकरांची बीसीसीआयकडे मागणी
Shivam Dube । ‘आम्हाला माहीत आहे…’, सामनावीर ठरलेल्या दुबेला रोहित काय म्हणाला?