मुंबई | भारताने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला असल्याचे बोलले जात आहे. आज पहाटे ३.३० वाजता भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.
भारताच्या १० मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर १ हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्वीट करत पाकिस्तानला सोशल मीडियावर समज दिला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक जेव्हा सामना संपल्यावर जसं बोलायचा तसाच काहीसा ट्वीट सेहवागने केला आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यावर इंझमाम बाॅयज प्लेअड वेल असे म्हणायचा. यावेळी जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर १ हजार किलोचे बॉम्ब वर्षाव करणाऱ्या भारतीय वायुदलासाठी सेहवागने असाच ट्वीट केला आहे.
“बाॅयज प्लेअड वेल, सुधर जाओ वरना सुधार देंगे. एअर स्ट्राईक” असा ट्वीट सेहवागने केला आहे.
The boys have played really well. #SudharJaaoWarnaSudhaarDenge #airstrike
— Virender Sehwag (@virendersehwag) February 26, 2019