भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजचा जन्म 3 डिसेंबर 1982 मध्ये जोधपूर येथे झाला. मितालीचा जन्म एका तमिळ कुटुंबातला आहे. तिच्या वडिलांचे नाव दुराई राज तर आईचे नाव लीला राज आहे. मितालीच्या भावाचे नाव मिथुन आहे. मिताली राजने भारतीय संघात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मिताली राज पहिली भारतीय महिला फलंदाज आहे जिने कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. विशेषतः मिताली राजला तिच्या कव्हर ड्राईव्हमुळे जास्त ओळखले जाते.
मितालीने महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. मिताली राजला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार अशा दोन महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भारतातील पहिली महिला खेळाडू आहे जिला विजडन इंडियन क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला आहे. मिताली स्टार क्रिकेटपटू झाल्यानंतर करोडोंची कमाई करत आहे. आजच्या लेखातून आपण त्याच विषयी जाणून घेऊया.
मितालीची वर्षाला करोडोंची कमाई
मिताली राज वर्षाला करोडोची कमाई करते. मात्र मिताली करोडोंची कमाई करत असूनही तिचे कुटुंब साधी राहणीमान पसंत करतात. मिताली राजचे कुटुंब अजूनही त्यांच्या जुन्या घरातच राहतात. मिताली राज वर्षाला जवळजवळ 5.5 करोड रुपये कमवते. बीसीसआयकडून तिला 10 ते 20 लाख रुपये मानधन मिळते. याच्या व्यतिरिक्त मिताली एखाद्या ब्रँड कंपनीद्वारे, टीव्हीवरील जाहिरातीद्वारे आणि एखाद्या टीव्ही कार्यक्रमद्वारे मानधन कमावते. त्याचबरोबर मितालीचे हैदराबाद मध्ये एक आलिशान अपार्टमेंट देखील आहे. एकूण वर्षभरात मितालीची निव्वळ कमाई 36 करोड इतकी जाते.
मितालीचे शिक्षण
मिताली राजचे शिक्षण हैदराबाद मध्ये झाले आहे. मिताली शाळेमध्ये असताना मुलांसोबत क्रिकेटचा सराव करत होती. मिताली अवघ्या 17 वर्षाची असताना भारतीय संघात तिची निवड झाली. मिताली राजचे सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. अनेक लोक तिला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर मिताली नेहमी सक्रिय असते. इंस्टाग्रामवर मितालीचे 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या:
फुटवर्क कपल! चहल दांम्पत्याचा नवा डान्स व्हिडिओ आला समोर
या कर्णधाराची छातीठोकपणे भविष्यवाणी, म्हणाला भारतच होईल कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता
न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने उलगडले संघाच्या विजयाचे रहस्य