मुंबई । चेन्नई सुपर किंग्ज संघाला या महिन्याच्या सुरूवातीला युएईमध्ये आयपीएलसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करायचे आहे. प्रशिक्षणासाठी परवानगी मिळाल्यास चेन्नई सुपरकिंग्जकडे प्रशिक्षणासाठी एक महिन्याचा कालावधी असेल. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू चेन्नई येथे आल्यानंतर विशेष विमानाने दुबईला रवाना होऊ शकतात.
इएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईत आल्यानंतर खेळाडू चार्टर प्लेनने दुबईला जाऊ शकतात. तथापि, भारत सरकारच्या परवानगीनंतरच हे शक्य होईल. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतरच सर्व परिस्थिती स्पष्ट होईल. रविवारी ही बैठक होणार असून त्यामध्ये स्पर्धा भरविण्याव्यतिरिक्त विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांविषयी बोलायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्जदेखील त्यापैकी एक संघ आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत तीन वेळा जेतेपद जिंकले आहे. मुंबई इंडियन्सनंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने बहुतेक वेळा जेतेपद जिंकले आहे. एमएस धोनी सुरुवातीपासूनच या संघात आहे. चेन्नई सुपर किंग्जमध्ये अनुभवी आणि तरूण खेळाडूंचा भरणा आहे.
आयपीएल २०२० मार्चमध्ये होणार होता तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू केले. धोनी आणि सुरेश रैनासह सर्व खेळाडू नेटवर दिसू लागले. कोरोना विषाणूमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे खेळाडू घरी गेले. सुरेश रैना आजकाल फार्म हाऊस आणि अन्य बर्याच ठिकाणी तो नेटवर फलंदाजी करताना दिसून येतो. तो चेन्नई सुपरकिंग्जमधील महत्वाचा खेळाडू आहे. धोनीशी त्याची चांगली मैत्री आहे. या वेळी चेन्नई सुपर किंग्जचा संघ कसा कामगिरी करतो हे पहावे लागेल.