---Advertisement---

कुस्ती महासंघाच्या निवडणूकीची घोषणा! ‘या’ तारखेला पार पडणार मतदार आणि निकाल

Brijbhushan Sharan Singh Wrestler Protests
---Advertisement---

भारतीय कुस्ती महासंघात येत्या काही दिवसांमध्ये मोठे फेरबदल होताना दिसतील. पुढच्या महिन्यात म्हणजे जुलै मध्ये 6 तारखेला कुस्ती महासंघाची निवणूक पार पडणार आहे. मतदानानंतर अगेच त्याच दिवशी निकाल देखील देखील जाहीर केला जाईल. मागच्या काही महिन्यांपासून भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात सुरू अशलेले आंदोलन या निवडणुकीनंतर काही प्रमाणात शांत होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मागच्या जवळपास चार-पाच महिन्यांपासून बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक हे मोठे कुस्तीपटू बृजभूषण सिंग () यांच्या विरोधात आंदोलन करत होते. 7 जून रोजी केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंशी चर्चा करून आंदोलन 15 जूनपर्यंत थांबवण्याची विनंती केली होती. क्रीडा मंत्र्यांंनी सांगितल्याप्रमाणे कुस्ती महासंघाची निवडणूक 30 जून रोजी होणे अपेक्षित होते. मात्र, कुस्ती महासंघाच्या वार्षीक सर्वसाधारन सभेसाठी 21 दिवस आधी नोटिस देणे गरजेचे होते, ज्यामुळे निवडणूकालाही उशीर झाला.
मंगळारी (13 जून) घोषणा करण्यात आली की, कुस्ती महासंघाच्या सर्व पदासांसाठी 6 जुलै रोजी निवडणूक पार पडेल. भारतीय ऑलिम्पिक असोसिएसनकडून जम्मू कश्मीरचे उच्च न्यायालयाचे माजी मुख्य नायाधिष मेहश मित्तल यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले गेल आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार निवडणूक अर्ज दाखल करण्याची तारीख 23 जून आहे आणि 25 जून रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. ज्यानंतर 28 जून रोजी अर्जाची छाननी केली जाईळ. 28 जून ते 1 जुलैदरम्यान अर्जदार आपला अर्ज मागे घेऊ शकतो. 2 जून रोजी प्रत्यक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

दरम्यान, निवडणुकीत पाहण्याची बाब हीच असेल की, बृजभूषण सिंग यांच्या कुटुंबातील किंवा नात्यातील एकाद्या व्यक्तिला उमेदवारी मिळते की नाही. कारण क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना शब्द दिला आहे की, सरकार बृजभूषणच्या घरातील किंवा नात्यातील एकालाही कुस्ती महासंघाची निवडणूक लढू देणार नाहीये. (The election of the Wrestling Federation of India will be held on July 6)

महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । नेथन लायन बनणार ‘एलिट’ क्लबचा मेंबर! करणार मोठा विक्रम  
रोहितची जागा घेणार ‘हा’ युवा ओपनर! वेस्ट इंडीज दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---