---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूने टाकला महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू, दिग्गजांना पझाडले

On: रविवार, फेब्रुवारी 26, 2023 2:58 PM
Sailing National
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकामध्ये सध्या महिलांचा टी-20 विश्वचषक खेळला जात आहे. अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियापाठोपाठ यजमान दक्षिण आफ्रिका संघ पोहोचला. उभय संघांतील अंतिम सामना रविवारी (26 फेब्रावारी) खेळला जाणार आहे. पण अंतिम सामन्याआधी महिला क्रिकेटच्या इतिहासातील एक मोठी बातमी समोर आली. आफ्रिकी संघाची 34 वर्षीय वेगवान गोलंदाज शबनम इस्माइल हिने महिला क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड (SAwvsENGw) यांच्यात शुक्रवारी (24 फेब्रावारी) महिला विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. यजमान संघाने इंग्लंडला या सामन्यात 6 विकेट्सने जिंकला आणि अंतिम सामन्यात धडक दिली. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनम इस्माइल (Shabnim Ismail) हिने या उपांत्या सामन्यात महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. तिने हा चेंडू 128 किमी ताशी गतीने टाकल्याचे सांगितले जात आहे. पण हा चेंडू अद्याप अधिकृतरित्या महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू असल्याचे घोषित केले गेले नाहीये. पण माध्यमांतील वृत्तांमध्ये मात्र असा उल्लेख केला जात आहे. इंग्लंडला या सामन्यात 6 धावांनी मात मिळाली.

उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका सघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 164 धावा केल्या. लॉरी वोल्वार्ड्टने 53 आणि तजमिन ब्रिट्सने 68 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये मारिजान कॅपने नाबाद 27 धावा केल्या. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने तीन विकेट्स घेतल्या. त्याआधी आफ्रिकी संघाची कर्णधार सून लूसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने 20 षटकांमध्ये 158 धावा केल्या आणि 6 धावांनी पराभव स्वीकारला.  जयमान संघाने आयाबोंगा खाकाने चार, तर शबनम इस्माइलने तीन विकेट्स घेतल्या. इंग्लंडसाठी नेट साइवरने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळला गेला. भारताला 5 धावांनी मात देत ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला होता. पाठोपाठ दक्षिण आफ्रिकानेही अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. अंतिम सामन्यात आफ्रिकी संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड वाटत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 महिला विश्वचषकांपैकी एक पहिल्या विश्वचषक सोडला, तर ऑस्ट्रेलियाने प्रत्येक वेळी अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. यापैकी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 साली ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक जिंकला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ मात्र इतिहिसात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात स्थान मिळवू  शकला.  (The fastest ball in women’s cricket bowled by South Africa’s Shabnim Ismail)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---