१३ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दुबई ओपन सुपर सिरीज फायनल स्पर्धेचे आज ड्रॉ जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत भारताकडून पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत हे दोघे सहभागी होणार आहेत.
पीव्ही सिंधू महिला एकेरीतून खेळणार आहे. आज जाहीर झालेल्या ड्रॉ नुसार ती अ गटातून खेळणार आहे. तिच्या गटात तिला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अकान यामागूची, सायका साटो आणि हे बिंगजिओ यांचे आव्हान असेल.
रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती सिंधूने या वर्षी इंडिया ओपन सुपर सिरीज आणि कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकली आहे. तसेच ग्लासगो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये आणि मागच्याच महिन्यात पार पडलेल्या हाँग काँग ओपनमध्ये तिने उपविजेतेपद मिळवले होते.
याबरोबरच जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणारा श्रीकांत पुरुष एकेरीतून खेळणार आहे. त्याने या वर्षात चार सुपर सिरीज विजेतेपदं मिळवली आहेत. एका वर्षात चार सुपर सिरीज विजेतेपदं मिळवणारा तो चौथा तर पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला होता.
त्याने इंडोनेशिया ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, डेन्मार्क ओपन सुपर सिरीज आणि फ्रेंच ओपन सुपर सिरीज या चार सुपर सिरीज स्पर्धा जिंकला आहे. श्रीकांत दुबई ओपन सुपर सिरीज फायनल स्पर्धेत बी गटातून खेळणार आहे. त्याला या गटात शी युकी,शोव तिएन चेन आणि विकटोर अक्सेल्सन यांचे आव्हान असेल.
या स्पर्धेत बीडब्ल्यूएफच्या क्रमवारीत प्रथम आठ खेळाडूंना संधी मिळते, त्यामुळे सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय या स्पर्धेस पात्र ठरू शकले नाहीत.
महिला एकेरीचे ड्रॉ:
अ गट:
-अकान यामागूची
-पीव्ही सिंधू
-सायका साटो
-हे बिंगजिओ
ब गट
-ताइ त्झू यिंग
-सुंग जी ह्युन
-राटचानोक इंटॅनोन
-चेन युफेई
पुरुष एकेरी ड्रॉ:
अ गट:
-सॉन वॅन हो
-ली चोंग वेई
-ना का लॉन्ग अॅंगस
-चेन लॉन्ग
ब गट:
-किदांबी श्रीकांत
-शी युकी
-शोव तिएन चेन
-विकटोर अक्सेल्सन