नवयुवक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुंडल आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात शिवशक्ती, जय हनुमान बाचणी, राजमाता जिजाऊ, शिवओम संघ तर पुरुष गटात उत्कर्ष, शिव शाहू, विजय क्लब व बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला .
महिला गटात शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर विरुद्ध द्रोणा स्पोर्ट्स पुणे पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. शिवशक्ती संघाने ५१-२० असा एकतर्फी विजय मिळवला. पुजा यादव, रक्षा नारकर, पौर्णिमा जेधे यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर जय हनुमान बाचणीने जागृती प्रतिष्ठान संघावर २८-२१ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक दिली.
राजमाता जिजाऊ विरुद्ध सुवर्णयुग या पुण्याच्या दोन बलाढ्य संघात लढत झाली. मध्यांतरापर्यत १८-१६ अशी सुवर्णयुग संघाकडे आघाडी होती मात्र मध्यंतरानंतर राजमाता संघाने आक्रमक खेळ करत आघाडी मिळवत ३१-२६ अशी बाजी मारली. राजमाता जिजाऊकडून अंकित जगताप, सलोनी गजमल, मानसी सावंत यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर शिवओम विरुद्ध एमएच स्पोर्ट्स यांच्यात अंत्यत चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवओम संघाने १६-१४ अशी बाजी मारली. शिवओमकडून पायल वसपेने अष्टपैलू खेळ केला.
पुरुष गटात उत्कर्ष क्रीडा संस्था पुणे संघाने २८-१७ असा तरुण मराठा सांगली संघाचा पराभव करत उपांत्य फेरी धडक दिली. उत्कर्षकडून आकाश पाटील व विकास पाटील यांनी चांगला खेळ केला. शिव शाहू सडोली कोल्हापूरने २५-२२ असे राजारामबापू कासेगाव संघाला नमवत उपांत्य फेरी गाठली.
विजय क्लबने सम्राट व्या मंडळ सांगली संघाचा २९-१३ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतरपर्यत १०-७ अशी शुल्लक आघाडी विजय क्लबकडे होती. मात्र त्यानंतर अजिंक्य कापरे, अक्षय सोनी व विजय दिवेकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन विरुद्ध शाहू सडोली कोल्हापूर लढतीत बाबुराव चांदेरे संघाने ३०-१७ बाजी मारत उपांत्य फेरीत धडक मारली.
महिला उपांत्य फेरी:
१) शिवशक्ती मुंबई शहर विरुद्ध जय हनुमान बाचणी
२) राजमाता जिजाऊ पुणे विरुद्ध शिवओम पुणे
पुरुष उपांत्य फेरी:
१) बाबुराव चांदेरे सो. फा. पुणे विरुद्ध विजय क्लब मुंबई
२) उत्कर्ष क्रीडा संस्था पुणे विरुद्ध शिव शाहू सडोली कोल्हापूर
कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, राजमाता जिजाऊ, उत्कर्ष, तरुण मराठा संघ बादफेरीत
वाचा👉https://t.co/C7ZAUXVz65👈#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020
या दिवशी होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
वाचा👉https://t.co/ZBYgrQWWax👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 12, 2020