सध्या लॉकडाऊनमुळे भारतातील क्रीडाक्षेत्र ठप्प झाले आहे. असे असले तरी भारतीय क्रिकेटसाठी एक आनंदाची गोष्ट अशी की लखनऊ येथे असलेले अटल बिहारी वाजपेयी एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम नव्या रंगरुपात तयार होत आहे.
मुख्य एकाना स्टेडियम आधीपासूनच आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जात आहे, परंतु आता त्याचे बी-ग्राऊंड नव्या रुपात तयार होत आहे. या बी-ग्राऊंडवर एक-दोन नव्हे तर तब्बल क्रिकेटच्या १९ खेळपट्ट्या तयार होत आहेत. त्यामुळे हे देशातील असे पहिले मैदान असेल जिथे १९ खेळपट्ट्या असणार आहेत.
या स्टेडियमवरील बी-ग्राऊंडवर लाल आणि काळी मातीच्या खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत. हे मुख्य खेळपट्टीला जोडल्या जातील. दोन्ही टोकाला लाल मातीच्या खेळपट्ट्या असतील तर मध्यभागी लाल आणि काळी मातीच्या खेळपट्टी असतील. ओडिशातील बालांगीरच्या तलावातील मातीपासून एकाना स्टेडियमवर काही खेळपट्ट्या तयार केल्या जातील, ही माती खेळपट्टी बनवण्यासाठी चांगली असते.
याबद्दल बीसीसीआयचे पिच क्यूरेटर शिव कुमार यांनी सांगितले की ‘बालांगीर तलावाची काळी माती खूप मजबूत असते. त्याची आर्द्रता लक्षात घेऊन नियमांनुसार रोलिंग केले तर खेळपट्टी सिमेंटसारखी बनते. या खेळपट्टीवर उसळी चांगली मिळते. फलंदाजांना मदत होते आणि गोलंदाजही यशस्वी ठरतात. लाल माती महाराष्ट्रातून मागवली आहे. लाल मातीच्या खेळपट्टी देखील खेळाडूंना मदत करतात.’
मैदानात इतक्या खेळपट्ट्या असल्याने सरावाला मदत मिळणार आहे. अनेक फलंदाज एकत्र नेट्समध्ये फलंदाजी करु शकतात. इंग्लंडच्या मैदानांवर अशाच सुविधा असतात. तसेच फलंदाजांना काळ्या आणि लाल मातीवर सरावाचीही संधी मिळेल. तसेच इथे खेळायला येणाऱ्या संघांना उच्च स्तरावरील खेळपट्ट्या सरावासाठी मिळतील. इथे आंतरराष्ट्रीय संघ देखील नेट्स लावू शकतात.
बी-ग्राऊंडवर काही सामने याआधी खेळवण्यात आले आहेत. यात भारत अ, भारत ब आणि बांगलादेश मधील त्रिरंगी मालिका, अफगाणिस्तान विरुद्ध भारत संघातील १९ वर्षांखालील ५ सामन्यांची वनडे मालिका इथे झाली आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने या मैदानाची कौतुक केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
गंभीर म्हणतो; ती गोष्ट मिळवली नाही तर कोहलीची कारकिर्द अधुरीच
हा दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘जमीन घेऊन धान्य पिकवेल आणि ते गरीब कुटुंबाला वाटेल’
आयपीएलमधला ‘हा’ स्टार खेळाडू करतोय आज उत्तर प्रदेशमध्ये शेती