आयपीएल ही क्रिकेट लीग तशी षटकार, चौकारांसाठीच ओळखली जाते. परंतु ज्या वेळी संघ संकटात असतो त्यावेळी एकेरी-दुहेरी धावेवर भर देऊन योग्य वेळ आली की फटकेबाजी करण्यात काही खेळाडू माहीर असतात. आयपीएल २०१७ मध्ये बऱ्याच खेळाडूंनी तब्बल १०० पेक्षा जास्त धावा ह्या एकेरी धावेने घेतल्या आहेत.
या यादीत ७ पैकी ५ भारतीय खेळाडू आहेत. विशेष म्हणजे यातील ५ पैकी ५ खेळाडू हे स्फोटक फलंदाज आहेत.
१. शिखर धवन
शिखर धवनने या मोसमात आजपर्यंत ३६९ धावा केल्या आहेत. त्यातील तब्बल १३० धावा या एकेरीच्या माध्यमातून त्याने जमवल्या आहेत.
२. गौतम गंभीर
केकेआरचा सर्वात यशस्वी कर्णधार असणारा गौतम गंभीर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३८७ धावांमध्ये गंभीरने १२५ धावा एकेरीच्या माध्यमातून केल्या आहेत.
३. सुरेश रैना
आयपीएलच्या प्रत्येक मोसमात ३००+ धावा करणारा रैना याही मोसमात चांगल्याच लयीत खेळत आहे. रैनाने १० सामन्यात ३१८ धावा करताना तब्बल ११६ धावा एकेरीच्या माध्यमातून केल्या आहेत.
पाहूया ही पूर्ण यादी:
१३० शिखर धवन
१२५ गौतम गंभीर
११६ सुरेश रैना
११५ डेविड वॉर्नर
११२ मनीष पांडे
१०९ स्टिव्ह स्मिथ
१०५ नितेश राणा