क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार खेळाडूंना अनेकदा मार्गदर्शन आणि सामन्यात त्यांचे नेतृत्व करत असतो, पण मैदानाबाहेत किंवा सामन्याव्यतिरिक्त संघातील खेळाडूंना आणि कर्णधारालाही एका चांगल्या प्रशिक्षकाची गरज असते. क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका चांगल्या प्रशिक्षकाने नेहमीच त्या संघांसाठी मोठ्या भूमिका पार पाडल्या आहेत, अनेकांनी संघांना विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवून दिले आहे.
आजकाल क्रिकेटपटूंना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. प्रशिक्षकावर संघाच्या चांगल्या प्रदर्शनासाठी खूप दबाव असतो. या सर्व कारणास्तव प्रशिक्षकांना क्रिकेट बोर्ड चांगले वेतनही देत असते. या लेखात जगातील पाच सर्वाधिक वेतन घेणाऱ्या प्रशिक्षकांची माहिती घेणार आहोत.
५. मिस्बाह-उल-हक- पाकिस्तान
पाकिस्तानचा माजी कर्णधार, फलंदाज आणि माजी प्रशिक्षक मिस्बाह उल हक मागच्या मागील काळापासून चर्चेत आहेत. त्याला काही काळापूर्वी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवले गेले होते. त्यांनी प्रशिक्षकपद सांभाळण्यापूर्वी मिकी आर्थर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक होते. मिकी आर्थर यांना २०१९ च्या विश्वचषकानंतर पीसीबीने अचानक पदावरून हटवले होते.
मिस्बाह सुरुवातीला वयाच्या ४६ व्या वर्षी निवडकर्त्यांच्या रूपात कर्यरत झाला होता. मात्र, काही महिन्यांतच त्याने त्या पदाचा राजीनामा दिला. त्याच्या संघ व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, पण तरीही पाकिस्तान संघाने मिस्बाहच्या प्रशिक्षणामध्ये दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध मालिका जिंकल्या आणि चांगले प्रदर्शन केरून दाखवले. मिस्बाहला जवळपास ०.२४ मिलियन डाॅलर्सचे वार्षिक वेतन मिळायचे.
४. मिकी आर्थर- श्रीलंका
दक्षिण अफ्रिकेत जन्म झालेले मिकी आर्थर आज जगातील सर्वात अनुभवी प्रशिक्षकांपैकी एक आहेत. त्यांनी यापूर्वी दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या देशांच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकाचे पद सांभाळलेले आहे. सुरुवातील मिकी आर्थर श्रीलंका संघासोबत मेंटाॅरच्या रूपात सहभागी झाले होते आणि नंतर त्यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक केले गेले आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) त्यांना २०१९ मध्ये अचानक पदावरून हटवले होते.
श्रीलंका संघासोबत आतापर्यंतचा मिकीचा प्रवास आव्हानात्मक राहिला आहे, कारण श्रीलंका संघ मागच्या काही काळापासून देशाबाहेर विजय मिळवण्यामध्ये अपयशी ठरत आहे. मिकी प्रशिक्षणासाठी वार्षिक ०.४६ मिलियन डाॅलर्स एवढी रक्कम घेतात.
३. क्रिस सिल्वरवुड- इंग्लंड
यादीत पुढच्या स्थानावर इंग्लंडचे प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड यांचे नाव आहे. त्यांना २०१९ मध्ये ऍशेज मालिकेनंतर ट्रेवर बेलिस यांच्या जागी प्रशिक्षकपद स्वीकारले होते. सिल्वरवुड यांनी इंग्लंड संघासोबत सन्मानजनक कामगिरी केली आहे. त्यांनी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, पण त्या तुलनेत कसोटी क्रिकेटमधील त्यांचे प्रदर्शन समाधानकारक नाही.
विशेष म्हणजे इंग्लंडला भारत दौऱ्यामध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. सिल्वरवुड यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धही मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. त्यांच्या वार्षिक वेतनाविषयी विचार केला तर, ईबीसी त्यांना वर्षाला ०.६० मिलियन डाॅलर्स रक्कम देते.
२. जस्टिन लँगर- ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू जस्टिन लॅंगर ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सुवर्णकाळामधील एक महत्वाचे नाव आहे. २०१८ मध्ये बाॅल टॅंपरिंग प्रकरणानंतर जस्टिन लँगरने डॅरेन लेहमॅनच्या जागी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. या बाॅल टँपरिंग प्रकरणाने ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या आत्मविश्वासाचा चुराडा केला होत. मात्र. लँगरने संघाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यांना संघाचे मार्गदर्शन करण्यासाठी ०.६१ मिलियन डाॅलर्स वर्षाला देते.
१. रवी शास्त्री- भारत
बीसीसीआय जगातील सर्वात जास्त श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे आणि तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकही जगात सर्वाधिक वेतन घेणारे प्रशिक्षक आहेत. शास्त्रींनी २०१४ मध्ये भारतीय संघासोबत निर्देशकाच्या रूपत कार्यरत झाले होते आणि त्यांनी हे पद पुढचे दोन वर्ष सांभाळले.
रवी शास्त्री २०१६ मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी महत्वाचे दावेदार होते, पण भारताचे माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी शास्त्रींनी या स्पर्धेत मागे सोडले आणि प्रशिक्षकपद सांभाळले होते. असे असले तरी कुंबळेंनी पुढच्या काही दिवसांत काही कारणास्तव पदाचा राजीनामा दिला. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली संघाने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ आगामी काळातील आयसीसी विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. बीसीसीआय शास्त्रींना भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यसाठी वार्षीक ९.५ ते १० करोड रुपयांची मोठी रक्कम देते.





