जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी मोठी पराभव स्वीकारावा लागला. मागच्या वर्षी आशिया चषक, त्यानंतर टी-20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. लागोपाठ तीन मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश अल्याने कर्णधार रोहित शर्मा याच्यासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफवर टीका होत आहे. माहितीनुसार येत्या चार महिन्यांतील संघाचे प्रदर्शन राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफसाठी महत्वाचे असणार आहे.
भारताने आपली शेवटची आयसीसी ट्रॉफी एमएस धोनीच्या नेतृत्वात 2013 साली जिंकली होती. त्यानंतर मागच्या 10 वर्षांपासून भारतात आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ आहे, जो यावेळीही लाबणीवर पडला आहे. यादरम्यानच्या काळात भारताने चार आयसीसी अंतिम सामने खेळले आणि प्रत्येक वेळी संघाला अपयश आले. मागच्या वर्षी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर राहुल द्रविड () यांच्या मार्गदर्शनात संघाचे प्रदर्शन सुधारेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण अद्याप असे काही होताना दिसत नाहीये.
याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून महत्वाची माहिती मिळाली. अधिकाऱ्याने सांगितले की, “संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करणे सोपे नाहीये. प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने चांगलं काम केलं नाही, असं आल्याला म्हणता येणार नाही. आपण मायदेशात जिंकलो आहोत. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचणं छोटी गोष्ट नाही. पण विदेशात संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. विश्वचषका अजून 4 महिने आहेत. अशात आम्ही त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही. पण प्रदर्शनावर नक्कीच चर्चा होईल.”
भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा एकंदरीच विचार केला, तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या साथीला फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप हे आहेत. सर्वाधिक प्रश्न राठोड यांच्यावर उपस्थित होत आहेत. कारण डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारताची वरची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. अनुभवी अजिंक्य रहाणे यांचे संघात पुनरागमन झाले. मात्र यष्टीरक्षक रिषभ पंत आणि वेगवा गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची कमी संघ भरून काठू शकला नाही.
दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या अंंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला एक महिन्याची विश्रांती मिळाली आहे. संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचेही बोलले जात आहे. (The four months before the ODI World Cup will be crucial for Rahul Dravid)
महत्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाचवण्यासाठी आयसीसी घेणार ‘हे’ दोन मोठे निर्णय! लीग क्रिकेटवर येणार मर्यादा
रोहितची जागा घेणार ‘हा’ युवा ओपनर! वेस्ट इंडीज दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता