इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी एक मेगा लिलाव (Mega Auction) आयोजित केला जाणार आहे. लिलावापूर्वी, उद्या म्हणजेच गुरूवार (31 ऑक्टोबर) रोजी सर्व संघांना त्यांच्या रिटेन्शन याद्या जाहीर कराव्या लागणार आहेत. चाहते या यादीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल कायम ठेवण्याच्या चर्चेदरम्यान चाहत्यांच्या आवडत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (RCB) महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) मोठी खेळी केली आहे. संघाने आपल्या ताफ्यात खतरनाक खेळाडूचा समावेश केला आहे.
आयपीएलमध्ये कायम ठेवण्याच्या एक दिवस आधी आज महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) आरसीबीने मोठी खेळी केली आहे. संघाने आपल्या ताफ्यात इंग्लंडची विस्फोटक फलंदाज डॅनी व्याटचा (Danni Wyatt) समावेश केला आहे. बेंगळुरूने यूपी वॉरियर्सच्या (UP Warriorz) व्यापाराद्वारे डॅनी व्याटला डब्ल्यूपीएल 2025च्या आधी संघात समाविष्ट केले आहे. आरसीबीने डॅनी व्याटला 30 लाख रुपये किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
🚨 NEWS 🚨
Danni Wyatt traded to Royal Challengers Bengaluru from UP Warriorz.
Details 🔽 #TATAWPL | @RCBTweets | @UPWarriorz https://t.co/ziXCNlHjSN
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) October 30, 2024
डॅनी व्याटला (Danni Wyatt) टी20 आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रदीर्घ अनुभव आहे. व्याटने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत इंग्लंडकडून 164 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 16 अर्धशतकांसह 2 शतके झळकावली आहेत. व्याट आरसीबीची फलंदाजी खूप मजबूत करेल. तिच्या आगमनानंतर संघाची फलंदाजी पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक होणार आहे. आरसीबीने शेवटच्या हंगामातच डब्ल्यूपीएलचे जेतेपद पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; भारताविरूद्ध घातला होता धुमाकूळ! मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंड फिरकीपटू भावूक
Champions Trophy 2025; पाकिस्तान कर्णधाराला झाली भारताची आठवण! म्हणाला…
केएल राहुलच्या जागी कोण बनणार लखनऊचा कर्णधार? सर्वात मोठ्या दावेदाराचं नाव उघड