बुधवार, 26 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी म्हणून बहुचर्चित आहे. या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला ऑस्ट्रेलियामध्ये मोठा इतिहास आहे.
असा आहे हा इतिहास –
बॉक्सिंग डे हा नाताळच्या दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी मालक, नोकर आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षभरातील चांगल्या कामाची भेट म्हणून ख्रिसमस बॉक्स दिला जातो. त्यामुळे त्याला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते.
त्याचबरोबर गरिब जनतेच्या मदतीसाठी नाताळाच्या दिवशी चर्चमध्ये एक बॉक्स ठेवला जातो जो दुसऱ्या दिवशी उघडला जातो. यामुळेही या दिवसाला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते.
या दिवशी दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना होणे ही वार्षिक परंपरा आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दरवर्षी खेळवला जातो. ऑस्ट्रेलिया संघ आणि पाहुण्या संघात हा सामना होतो.
1980 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला आहे. त्याच्या एक वर्षआधी केरी पॅकर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटसाठी टेलिव्हिजन हक्क आणले होते.
पहिला बॉक्सिंग डे सामना 1950 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या संघात झाला होता. हा सामना 22 डिसेंबरला सुरु झाला होता आणि 27 डिसेंबरला संपला होता.
1980 आधी फक्त चार वेळा मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला गेला आहे. यामध्ये 1952 मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. या सामन्यापासून खऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली.
त्यानंतर 1968 आणि 1975 मध्ये विंडिज विरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवले होते. तसेच 1974 ला इंग्लंड विरुद्ध झालेला बॉक्सिंग डे कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
त्याचबरोबर 1967, 1972 आणि 1976 या वर्षीही बॉक्सिंग डेला कसोटी सामना झाला होता पण हे सामने अॅडलेडमध्ये खेळवण्यात आले होते.
पण 1980 नंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे बॉक्सिंग डेसाठी कायमचे ठिकाण झाले आहे. फक्त 1989 मध्ये बॉक्सिंग डे कसोटीमध्ये थोडा बदल झाला होता. त्यादिवशी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात वनडे सामना पार पडला होता.
1980 नंतर आत्तापर्यंत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 37 बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
-ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिका हा संघ जिंकणार, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
–कोहलीच्या आक्रमक स्वभावाचे विंडिजच्या दिग्गज फलंदाजाने केले समर्थन…
–मेलबर्न कसोटीआधी रविवारपर्यंत टीम इंडियाच्या सरावाला सुट्टी…