क्रिकेटचे सर्वात नवीन रूप असलेल्या ‘द हंड्रेड’ लीगला २१ जुलैपासून इंग्लंड येथे सुरुवात झाली. आठ फ्रेंचायझींच्या या स्पर्धेला तीन दिवसात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही स्वरुपात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेमध्ये खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेत मालिकावीर ठरलेल्या इंग्लंडच्या लियाम लिव्हींगस्टोनने या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात देखील एक अचाट कामगिरी करून दाखवली.
लियाम लिव्हींगस्टोनचा गगनचुंबी षटकार
‘द हंड्रेड’ लीगमध्ये लियाम लिव्हींगस्टोन बर्मिंघम फिनिक्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शुक्रवारी (२३ जुलै) उशिरा झालेल्या सामन्यात त्याने लंडन स्पिरिट संघाविरुद्ध खेळताना १५ चेंडूंमध्ये एक चौकार आणि एका षटकारासह १९ धावांची खेळी केली. यादरम्यान लिव्हींगस्टोनने बाराव्या षटकात लंडनचा गोलंदाज ब्लॅक कलेन याच्या चेंडूवर तब्बल १०२ मीटर लांबीचा गगनचुंबी षटकार खेचला. त्याच्या या षटकारानंतर चाहत्यांना काही दिवसांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध ठोकलेल्या षटकाराची आठवण झाली.
पाकिस्तान विरुद्ध ठोकलेला १२२ मीटरचा षटकार
मागील आठवड्यात इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली होती. त्यातील दुसऱ्या सामन्यात लिव्हींगस्टोनने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या चेंडूवर तब्बल १२२ मीटर लांबीचा खणखणीत षटकार ठोकलेला. या मालिकेचा मानकरी लियाम लिव्हींगस्टोनला घोषित करण्यात आले होते. मालिकेतील पहिल्या सामन्यात लिव्हींगस्टोनने तुफानी शतक साजरे केलेले.
Liam Livingstone hitting 100-meter sixes for fun, in the Pakistan T20 series, he smashed 122 meter and in Hundred, he smashed 102 meter.pic.twitter.com/VeU1figb8U
— Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2021
लंडनने केला बर्मिंघमचा पराभव
‘द’ हंड्रेड लीगमधील पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात मोईन अलीच्या नेतृत्वातील बर्मिंघम फिनिक्स संघाने ओएन मॉर्गन नेतृत्व करत असलेल्या लंडन स्पिरिटला तीन गडी राखून पराभूत केले. लंडन संघाने दिलेले १४५ धावांचे आव्हान त्यांनी ९७ चेंडूमध्ये गाठले. बर्मिंघम संघासाठी कर्णधार मोईन अली (४०) व ख्रिस बेंजामिन (२४) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकाच्या कर्णधाराने लाईव्ह सामन्यात वापरले नकोसे शब्द, आयसीसीने दिली शिक्षा
प्रशिक्षक द्रविड यांचा आवडता बनला आहे ‘हा’ खेळाडू! सातत्याने अपयशी ठरूनही देतायत संधी