सध्या क्रिकेटच्या मैदानात नवा षटकार किंग नावारूपास आला आहे. या खेळाडूने इंंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), टी२० ब्लास्टनंतर द हंड्रेड लीग (The Hundred League) यामध्ये धुमाकूळ घातला आहे. इंग्लंडचा फलंदाज लियाम लिविंगस्टोनने इंग्लंडच्या द हंड्रेड लीगच्या दुसऱ्या हंगामात तुफानी फलंदाजी केली आहे. या लीगमध्ये बर्मिंघम फोनेक्सकडून खेळताना त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. यावेळी त्याने एक विचित्र पद्धतीने शॉट खेळला असून त्यावर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
लियाम लिविंगस्टोन या उजव्या हाताच्या फलंदाजाने बर्मिंघम फोनेक्स विरुद्ध ट्रेंट रॉकेट्स सामन्यात नाबाद ५१ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ३२ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकार फटकारले. त्यातील एक षटकार त्याने फक्त डाव्या हाताने खेळला असून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याने या षटकाराबरोबर त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला विजयही मिळवून दिला. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ द हंड्रेड लीगने पोस्ट केला आहे.
https://twitter.com/thehundred/status/1559272056981684230?s=20&t=AxCnGNvJYFXOwoBtH99vQQ
बर्मिंघमने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ट्रेंटने १०० चेंडूत ६ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या. बर्मिंघमने गोलंदाजी करताना ट्रेटं संघाची दाणादाण उडविली. त्यांनी ५४ चेंडूत ५३ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. यावेळी ट्रेंटच्या लेविस ग्रेगोरी आणि डॅनियम सॅम्स यांनी नाबाद ९२ धावांची भागीदारी रचली. यामुळे संघ १४५ धावापर्यंत पोहोचला. सॅम्सने २५ चेंडूत नाबाद ५५ आणि लेविसने २२ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना बर्मिंघमच्या पहिल्या दोन विकेट लवकर पडल्या. यावेळी लिविंगस्टोनने कर्णधार मोईन अलीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ८५ धावांची भागीदरी रचली. यावेळी मोईन अली २८ चेंडूत ५२ धावा करत बाद झाला. हा सामना बर्मिंघमने ७ विकेट्सने जिंकला. त्यांच्या पहिल्या तिन्ही विकेट ल्युक घेतल्या. त्याने २० चेंडूत १७ धावा दिल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: मनिष पांडेचा झेल पाहून म्हणाल, “हाच भारताचा बेस्ट फिल्डर”
‘रोहित त्याच्या खेळाडूंची नेहमी पाठराखण करतो’ माजी यष्टीरक्षकाने केला खुलासा
अल्टीमेट खो खो स्पर्धेत मुंबई खिलाडीज संघाने खाते उघडले, राजस्थान वॉरियर्सवर आठ गुणांनी मात