---Advertisement---

आर अश्विनच्या फिरकीपुढे गोंधळला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू, झेल दिला थेट हातात; पाहा Video

On: शुक्रवार, डिसेंबर 18, 2020 2:51 PM
---Advertisement---

बहुप्रतिक्षित भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेची गुरुवारपासून (१७ डिसेंबर) ऍडलेड येथे सुरुवात झाली. गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवण्यात येत असलेल्या या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू आर अश्विन यांच्या भेदक गोलंदाजीचा हात आहे. नुकतीच अश्विनने ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली आहे.

झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियापुढे २४५ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना २७व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाने ३ बाद ४५ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी अष्टपैलू खेळाडू ट्रॅव्हिस हेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. २० चेंडूंमध्ये कशाबशा त्याने ७ धावा काढल्या. पण अश्विनच्या गोलंदाजीपुढे त्याने आपले गुडघे टेकले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने डावातील ३५वे षटक अश्विनकडे सोपवले. या षटकातील पहिल्या तीन चेंडूमध्ये त्याने केवळ एक धाव दिली. पुढे चौथ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या ट्रॅव्हिस हेडने ऑन साइडला साधारण शॉट मारण्याच्या प्रयत्नात थेट अश्विनच्या हातात चेंडू दिला. अशाप्रकारे अश्विनने हेडचा झेल घेत संघाला चौथी विकेट मिळवून दिली.

तत्पूर्वी अश्विनने स्टिव्ह स्मिथची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. तसेच कॅमरॉन ग्रीनलाही ११ धावांवर तंबूत धाडले.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---