ग्लासगो: येथे सुरु असलेल्या जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्तम होत आहे. यावर्षी २३ भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पदकाची अपेक्षा असणारे कदांबी श्रीकांत, साई प्रणीत, अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी यांनी पहिल्या फेरीतील आपापले सामने जिंकले आहेत. आज हे खेळाडू दुसऱ्या फेरीतील सामने खेळतील.
साईना नेहवालला या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यामुळे तिचा दुसऱ्या फेरीतील सामना आज होणार आहे. तन्वी लाड आज आपले कौशल्य जागतीक स्पर्धेत अजमावणार आहे. आज किदांबी श्रीकांत, साई प्रणीत आणि साईना नेहवाल याचे सामने आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहेत. तर बाकी भारतीय खेळाडूंकडून विजयाची अपेक्षा असणार आहे.
आजचे सामने-
कोर्ट १ वरील सामने –
१. पुरुष एकेरी- किदांबी श्रीकांत वि. लुकास कर्वी
२. पुरुष एकेरी- समीर वर्मा वि. राजीव योसेफ
३. महिला एकेरी- रितुपर्णा दास वि. क्रिस्टी गिल्मोर
कोर्ट २ वरील सामने-
१. महिला एकेरी- तन्वी लाड वि.सुंग जी ह्युन
२. महिला दुहेरी- अश्विनी पोअप्पा – एन. सिक्की रेड्डी वि. कमीला झूल- क्रिस्टीना पेडरसन
कोर्ट ३ वरील सामने-
१.महिला एकेरी- साईना नेहवाल वि. साब्रीना जॅकवेट
कोर्ट ४वरील सामने-
१. पुरुष एकेरी- साई प्रणीत वि. ऍंथोनी गिनटीन
कोर्ट ५ वरील सामने-
१. पुरुष एकेरी- अजय जयराम वि.मार्क कॅलजोऊल
२.महिला दुहेरी- संजना संतोष -आरती सारा सुनील वि. बॉ यिक्सिन -यु क्सियोहान