भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही प्रभारी कर्णदार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली. अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने आपल्या खेळाबरोबरच खेळ भावनेनेही सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत.
मालिकेत अनेक वेळा अजिंक्यने खिलाडूवृत्ती दाखवली आहे. मग ते सिराजला मैदानातून बाहेर जाताना संघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे असो, अथवा युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे असो. अशातच अजिंक्यने ब्रिस्बेन कसोटी सामना संपल्यानंतर आपला १०० वा कसोटी सामना खेळत असलेला ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनचा सन्मान केला. अजिंक्यने यावेळी भारतीय खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली संघाची जर्सी लायनला भेट दिली.
Cap @ajinkyarahane88 shows amazing gesture towards Nathan Lyon by presenting him a signed t-shirt on behalf of #TeamIndia for his 100th test.
I'm sure the 🐐 gonna remember this series win as 'the real 🐐'.#INDvsAUS pic.twitter.com/1LxIFspExV— ᴮᴱ Krittik⁷ (@Kritt1K) January 19, 2021
Also his today's gesture to Nathan Lyonpic.twitter.com/0dIcxsCUlN
— Pritish Thakare (@ipritishthakare) January 19, 2021
ब्रिस्बेन येथे झालेला मालिकेतील शेवटचा सामना ऐतिहासिक ठरला.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.
दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराजने ५ तर शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे लक्ष ७ विकेट्स गमावत पूर्ण करत ,ऐतिहासिक विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –