---Advertisement---

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 9:04 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटीत भारताने आज ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी जबरदस्त इच्छाशक्तीचे प्रदर्शन केले. मात्र श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या पाठलागात हृदयाची धडधड वाढविणारे अनेक क्षण आले.

मोक्याच्या क्षणी विकेट पडताच सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकण्याची शक्यता निर्माण होत होती, तर भारतीय फलंदाजांचे फटके पाहून भारत हे आव्हान सहज पार करेल असे वाटून जात होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या हा सामना पाहताना सगळ्यांचेच हृदयाचे ठोके थांबत होते.

भारतीय संघाच्या खेळाडूंची अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. प्रत्येक धावेगणिक संमिश्र प्रतिक्रिया त्यांच्यातून उमटत होत्या. शेवटचा चौकार गेल्यानंतर विजयावर शिक्कामोर्तब होताच भारतीय खेळाडूंमध्ये उत्साहाला उधाण आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हेच क्षण टिपणारा एक सुंदर व्हिडिओ सामना संपल्यावर शेअर केला.

दरम्यान, पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर लढाऊ वृत्ती दाखवत भारताने केलेल्या या पुनरागमनाचे कौतुक अनेक दिग्गजांनी केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इत्यादींनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली खुश! ‘असे’ ट्विट करत केले अभिनंदन

एक घाव अन् दोन तुकडे! भारताने आत्तापर्यंत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑसी संघांचे ‘एवढे’ विश्वविक्रम केलेत खंडित

‘मार बसला तरी आपण नेटाने उभा राहिलो’, क्रिकेटच्या देवाकडून संघाचं खास शब्दात कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---