सध्या दुलीप ट्राॅफी (Duleep Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये भारताचे युवा स्टार खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. तत्पूर्वी या दुलीप ट्राॅफीमधून भारतीय संघाला काही युवा स्टार खेळाडू मिळू शकतात. जे शेवटच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसले आहेत. या बातमीद्वारे आपण 4 युवा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे भारतीय संघात लवकरच पदार्पण करू शकतात.
1) मुशीर खान- मुशीर खान (Musheer Khan) 2024 दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-बी कडून खेळत आहे. मुशीरने भारत-अ संघाच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध 181 धावांची शानदार खेळी खेळून बरीच प्रसिद्धी मिळवली. मुशीरची कामगिरी पाहता तो भविष्यात टीम इंडियाचा सुपरस्टार बनू शकतो, असे मानले जात आहे.
2) अभिषेक पोरेल- यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल (Abhishek Porel) आयपीएल 2024 मध्ये त्याच्या विस्फोटक फलंदाजीने प्रसिद्धीच्या झोतात आला. तो दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-क संघाचा भाग आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात पोरेलने 34 आणि नाबाद 35 धावांची खेळी खेळली. भविष्यात पोरेल भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज बनू शकतो.
3) हर्षित राणा- वेगवान गोलंदाज हर्षित राणाला (Harshit Rana) आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनंतर पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये देशाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. राणा दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-डी कडून खेळत आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या आहेत.
4) यश दयाल- डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने (Yash Dayal) आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. मात्र, यश दयाल रेड बॉल फॉरमॅटमध्ये त्याहूनही धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. यूपीचा दयाल 2024 दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-बी संघाचा भाग आहे. यशने पहिल्या फेरीच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे हा 4 फुट उंचीचा पॅरा ॲथलीट, ज्यानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं?
24 वर्ष…एकही पराभव नाही! बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये भारताचा तुफानी रेकॉर्ड; आकडेवारी खूपच धक्कादायक
दुलीप ट्रॉफीमध्ये आरसीबीच्या गोलंदाजाचा कहर, पहिल्याच सामन्यात घेतल्या 9 विकेट