भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ घोषित करण्यात आले आहेत, तर वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. दोन्ही संघ पहिला सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर भिडणार आहेत. तत्पूर्वी या मैदानावर भारतीय खेळाडू घाम गाळताना दिसत आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) पहिला कसोटी सामना (22 नोव्हेंबर) पासून सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळणार नसून नेटमध्ये तयारी करण्यात व्यस्त आहे. भारत अ संघाविरूद्धचा सराव सामना नियोजित होता, पण दुखापतीमुळे तो रद्द करण्यात आला. मंगळवारी (12 नोव्हेंबर) डब्ल्यूएसीए येथे सराव सत्रात मुख्य फलंदाजांपैकी एक, केएल राहुल, (KL Rahul) पर्थमधील पहिल्या कसोटीपूर्वी त्याच्या जुन्या फाॅर्ममध्ये परत येण्यासाठी सज्ज दिसत होता. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी देखील नेटमध्ये जोरात सराव केला.
KL Rahul was one of the main batters to have a net in India’s training session today at the WACA pic.twitter.com/3MXVU0p8FH
— Tristan Lavalette (@trislavalette) November 12, 2024
केएल राहुलबद्दल बोलायचे झाले, तर त्याला (KL Rahul) कसोटी सामन्यांमध्ये सतत संधी मिळत आहे, परंतु तो फ्लॉप ठरत आहे. बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतही राहुलच्या बॅटमधून मोठी धावसंख्या झाली नाही. त्याच वेळी, न्यूझीलंडविरूद्धच्या एकमेव बेंगळुरू कसोटीत त्याने 0 आणि 12 धावा केल्या. त्यामुळे त्याला उर्वरित सामन्यांमध्ये संघात स्थान मिळाले नाही. केएल त्याला भारत अ संघाकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले होते, जिथे तो संधीचा फायदा घेण्यात यशस्वी ठरला नाही.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले, तर न्यूझीलंड कसोटी मालिकेपूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचणे हे भारतीय संघासाठी सोपे वाटत होते. मात्र आता हा प्रवास खूपच खडतर झाला आहे. भारताला ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका 4-0 ने जिंकावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा चॅम्पियन खेळाडू बनला दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक…!
पाकिस्तानच्या 38 वर्षीय खेळाडूने जिंकला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार
ICC Ranking; आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंची घसरण! टाॅप-20 मध्ये नाही एकही भारतीय