महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. लीग स्टेजचे शेवटचे दोन सामने शनिवारी (24 जून) खेळले जाणार आहे. दिवसातील पहिला सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स असा होईल, तर दुसरा सामना कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगन नाशिक टायटन्स यांच्यात होईल.
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 (MPL 2023) च्या लीग स्टेजचा हा शेवटचा दिवस असला, तरी प्लेऑफचे चारही संघ आधीच निश्चित झाले आहेत. शनिवारी लीग स्टेजचा शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणारे पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स हे चाहरी संघ आधीच प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पुणे संघाचे प्लेऑफमधील स्थान शुक्रवारी (23 जून) म्हणजे सर्वात शेवटची निश्चित झाले. सोलापूर रॉयल्स छत्रपती संभाजी किंग्ज यांच्यातील सामना संभाजी किंग्जने जिंकला. सोलापूर संघ पराभूत होताच पुणे संघाचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले. सोलापरूने जर या सामन्यात विजय मिलवला असता, तर मात्र पुण्याला प्लेऑफसाठी संघर्ष करावा लागू शकत होता.
नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पुणे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले असले, तर शनिवारचे सामने या चारही संघांसाठी महत्वाचे ठरतील. शनिवारच्या सामन्यांनंतर गुणतालिकेत फेरबदल होऊ शकतो. पहिल्या दोन स्थानावर असणाऱ्या संघांमध्ये क्वॉलिफायर एक खेळला जाईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला मात्र थेट एलिमिनेटर खेळावा लागणार आहे. क्वॉलिफायर एकमध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटर सामन्यात जिंकलेला संघ नंतर क्वॉलिफायर दोनमध्ये भिडतील. क्वॉलिफायर विजेत्यांमध्ये एमपीएल 2023चा अंतिम सामना29 जून रोजी खेळवला जाणार आहे. (The last day of the league stage of MPL 2023 will be crucial, all four teams of playoffs will clash )
प्लेऑफ फेरीचे वेळापत्रक
26 जून 2023 – क्वॉलिफायर एक
27 जून 2023 – एलिमिनेटर
28 जून 2023 – क्वॉलिफायर दोन
29 जून 2023 – अंतिम सामना
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023: सीएसकेची विजयी अखेर! सोलापूरच्या पराभवासह पुणेरी बाप्पा प्ले ऑफमध्ये
वाढदिवस विशेष: युवीने 6 षटकार मारूनही ब्रॉड आज क्रिकेटचा GOAT बनलाय